Bondi to Coogee walk
२९ जुलै. सिडनीमध्ये येऊन जवळपास आता दीड महिना झाला होता. तरी अजून सिडनी शहारामधले एकही beach पाहिले नव्हते. माझा आधीच्या ऑफिस मधला एक मित्र, अविनाश. आम्ही जवळपास तीन एक वर्ष एकत्र कामाला होतो. अगदी जवळची ओळख होती. तो सिडनी युनिव्हर्सिटी मध्ये मास्टर्स करत होता. त्याचा course नुकताच पूर्ण झाला होता आणि त्याचे ऑफिस माझ्या ऑफिसच्या जवळ. त्यामुळे आमची तशी बऱ्यापैकी भेट होत होती.
सिडनीच्या प्रसिद्ध Bondi Beach बद्दल ऐकले होते. इंटरनेटवर पण माहिती वाचली होती. बोन्डाय बीच ते कूजी बीच ह्या trail walk बद्दल ऐकले होते. मग अविनाशला विचारले कि ह्या रविवारी जायचं का? तो पण एका पायावर तयार. मग ठरले. रविवारी लंचला भेटायचे आणि मग तिथून Bondi Beach ला जायचे आणि तिथून चालायला सुरुवात करायची. थंडीचे दिवस, त्यामुळे दुपारी उन्हात चालण्याचा त्रास नव्हता.
रविवारी मग सगळं आटपून आधी Town Hall स्टेशन गाठले. तिथून मेट्रो ट्रेनने Bondi Junction स्टेशनला आलो. इथे अविनाश भेटला. पुढे मग स्टेशनच्या बाहेरूनच बस पकडून Bondi Beach वर आलो. आज Sunday, म्हणजे Sydney मधले सगळे public transport, मेट्रो, बस, फेरी ह्या सगळ्यांची किंमत २. ७० ऑस्ट्रेलियन डॉलर्स. दिवसभर कितीही, कसेही फिरा. संपूर्ण प्रवासाचे भाडे जास्तीतजास्त एव्हढेच. सार्वजनिक वाहतुकीला उत्तेजन देण्याचा एक चांगला प्रयत्न.
दुपारच्या १२ पर्यन्त Bondi ला आलो. आधी जेवायला हॉटेल शोधले. इटालियन. इथे veg options जवळपास नाहीच. पुढचा धक्का म्हणजे एकही पिझ्झामध्ये चिकन नाही! आम्ही दोघे pure non vegetarian. मग काय मजाच. लंच होताच Bondi च्या मेन रोड वर आलो. समोरच हे एवढे मोठ्ठे बीच!
![]() |
Bondi Beach |
हे बीच नक्कीच बऱ्यापैकी मोठे होते. आणि एवढे प्रसिद्ध असून सुद्धा एवढे स्वच्छ! त्यात आजचं हवामान पण मस्त. थोडा वारा, बऱ्यापैकी सूर्यप्रकाश आणि मधेच थोडेसे ढग. फोटोग्राफी साठी एकदम छान. मग bondi beach च्या उजव्या हाताने बीच वरूनच आम्ही चालू लागलो. पुढे ५ मिनिटांवर बीचच्या टोकावर आलो. इथे थोड्या पायऱ्या चढून थोडं उंचावर आलो. पुढे रेलिंग होतेच. त्याखाली cliffs. खडकाळ किनारा. एका बाजूला लांबलचक बोन्डायचा किनारा आणि दुसरीकडे अथांग प्रशांत महासागर. मग काय, माझी फोटोग्राफी सुरु.
आता बोन्डाय बीच सोडून आम्ही पुढच्या बीच कडे वाटचाल सुरु केली. पुढंच बीच Tamarama Beach. Bondi पासून Tamarama पर्यंतची वाट एकदम मस्त. एका बाजूला row houses, आणि दुसरीकडे समुद्र. दोघांच्या मध्ये चालायचा ट्रॅक. मधेच थोडा चढ, मधेच छोटासा उतार, मधेच पायऱ्या. म्हणजे चालायला पण एक वेगळी मजा. त्यात हा रस्ता थोडा उंचावर. म्हणजे आपण छोट्याश्या डोंगराला वळसा घालून दुसऱ्या बीच वर आल्याचाच भास होतो. थोडं पुढे गेल्यावर भले मोठे उंच खडक होते . इथे आरामात बसून फोटो काढले. आणि काढून घेतले 😎.
हे तमारामा बीच म्हणजे surfing साठी पर्वणीच. कितीतरी लोकं इथे sea surfing ला येतात. अगदी हिवाळ्यात सुद्धा. म्हटले, surfing नाहीतर atleast आपण पण जरा समुद्राच्या पाण्यात पाय ओले करून घ्यावे. आणि राहिलो उभा, पहिल्याच लाटेनंतर परत फिरलो. थंडी, त्यात ऊन, दुपारची वेळ. पण पाणी कसले थंड! गोठवणारे! मग थोडावेळ असाच जवळच्या दगडांवर बसून timepass केला.
Tamarama beach संपतोय तोच Bronte beach चा रस्ता सुरु. हा बीच Tamarama पेक्षा नक्कीच मोठा होता. हा पण surfing साठी famous. मगाचचे Tamarama beach बऱ्यापैकी अर्धवर्तुळाकार होते. हे Bronte मात्र Bondi सारखेच लांबलचक. आधीच्या दोन्ही किनाऱ्यालगत छोट्या गार्डन्स किंवा लहान घरे होते. इथे जास्त काही नाही. मला तरी Bronte beach अगदीच साधासुधा वाटला.
Bronte वरून पुढे निघताच परत थोडे चढ-उतार सुरु झाले. शेवटी एक चढ लागला. वर पर्यंत येताच आधी असणारी गर्दी, लोकांचे आवाज, वारा, लाटांचा आवाज, सगळं गायब! पुढे चालत गेल्यावर एक स्मशानभूमी आली. म्हणजे आम्ही काही रस्ता भरकटलो नव्हतो. Bondi ते Coogee beach walk मधलाच हा एक भाग. तर हा रस्ता म्हणजे ह्या ख्रिश्चन स्मशानभूमीच्या अगदी मधून जाणारा. तशी हि cemetery खूपच जुनी. तिथे असलेल्या gravestones वरील लिखाण आणि उल्लेख पाहून कळत होते कि हे खूप जुने आहेत. काही काही ठिकाणी तर १८६०-७० सालातील उल्लेख होता. स्मशानाच्या काही भागाची २०१६ साली आलेल्या वादळाच्या तडाख्यामुळे पडझड झाली होती. तसा इथे आमच्यासारख्या इतर tourists चा वावर होताच, पण वातावरणात एक गूढ शांतता होती. आता खरंच होती, की माझ्या मनाचा संभ्रम? असो.
पुढे गेल्यावर एक अगदीच छोटे बीच आले. साधारण इंग्राचीच्या U आकाराचे. ह्याचे नाव Clovelly beach. इथे एक छोटा swimming pool होता. अगदी beach ला लागून. बरीच लहान मुले तिथे उड्या मारत होती. lunch नंतर चालणं सुरु केल्यापासून हा चौथा बीच. एव्हाना ४:३० वाजत आले होते. अजून २ बीच बाकी होते. हा बीच walk म्हणजे एक वेगळाच आणि नवीन अनुभव होता. मी या आधी असेच एकदा कर्नाटकातले ८-१० किनारे २ दिवसांत फिरलो होतो. पण हा भाग वेगळा होता. मध्येच वाळू, मधेच खडकाळ भाग, काहीठिकाणी छान रस्ता तर काही ठिकाणी अगदी साधा trail. मधेच बीच आणि एक स्मशानभूमी. फोटोग्राफी आणि ब्लॉग साठी तर हि नक्कीच पर्वणी होती 😛 असो.
तर अविनाश बरोबर अश्याच गप्पा मारत, जुन्या ऑफिस च्या आठवणी, gossips करत ५-५:१५ ला आम्ही Coogee beach वर आलो. एव्हाना हळूहळू सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती. बोन्डाय बीच सारखाच हा कूजी बीच सुद्धा तेव्हढाच प्रसिद्ध. बाकीच्या किनाऱ्यांपेक्षा इथे खूपच वर्दळ. बीच ला लागूनच कॅफे आणि बार. त्यात आज रविवार म्हणजे जरा जास्तच गर्दी.
मग आता इथेच थोडा वेळ घालवला. अजून फोटो काढले. आज dinner चा प्लॅन म्हणजे घरगुती जेवण. अविनाशचं घर ह्या बीच पासून १५-२० मिनिटं चालत. त्याच्या आग्रहाखातर आज dinner ला डाळ भात आणि चिकन असा बेत! मी सुद्धा ३-४ आठवड्यात घरगुती काही खाल्ले नव्हते. त्यामुळे आज जास्तच मजा. जेवण झाल्यावर रात्री ८ च्या आसपास बसने हॉटेल वर आलो. पुढचा सगळं आठवडा busy होता. आज काढलेले फोटो edit करण्यासाठी 😅
![]() |
Bondi Beach |
![]() |
Bondi to Tamaram Beach walk |
हे तमारामा बीच म्हणजे surfing साठी पर्वणीच. कितीतरी लोकं इथे sea surfing ला येतात. अगदी हिवाळ्यात सुद्धा. म्हटले, surfing नाहीतर atleast आपण पण जरा समुद्राच्या पाण्यात पाय ओले करून घ्यावे. आणि राहिलो उभा, पहिल्याच लाटेनंतर परत फिरलो. थंडी, त्यात ऊन, दुपारची वेळ. पण पाणी कसले थंड! गोठवणारे! मग थोडावेळ असाच जवळच्या दगडांवर बसून timepass केला.
Tamarama beach संपतोय तोच Bronte beach चा रस्ता सुरु. हा बीच Tamarama पेक्षा नक्कीच मोठा होता. हा पण surfing साठी famous. मगाचचे Tamarama beach बऱ्यापैकी अर्धवर्तुळाकार होते. हे Bronte मात्र Bondi सारखेच लांबलचक. आधीच्या दोन्ही किनाऱ्यालगत छोट्या गार्डन्स किंवा लहान घरे होते. इथे जास्त काही नाही. मला तरी Bronte beach अगदीच साधासुधा वाटला.
![]() |
मी आणि बॅकग्राऊंड मध्ये Bronte बीच |
![]() |
Waverley Cemetery च्या दिशेने जाताना |
तर अविनाश बरोबर अश्याच गप्पा मारत, जुन्या ऑफिस च्या आठवणी, gossips करत ५-५:१५ ला आम्ही Coogee beach वर आलो. एव्हाना हळूहळू सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती. बोन्डाय बीच सारखाच हा कूजी बीच सुद्धा तेव्हढाच प्रसिद्ध. बाकीच्या किनाऱ्यांपेक्षा इथे खूपच वर्दळ. बीच ला लागूनच कॅफे आणि बार. त्यात आज रविवार म्हणजे जरा जास्तच गर्दी.
![]() |
Coogee beach |
To be continued....
0 Comments