Himalayan Trekking Expedition to Kedarkantha : भाग 2

सांकरी

सकाळी ५:३० ला alarm होताच पटकन उठलो. बाकीचे trekkers पण उठत होते. सकाळची तयारी झाली. तयारी कसली! थंड पाण्यात पटापट आटपले. हिमालयन ट्रेकला आंघोळीला सुट्टीच. त्यात winter ट्रेक. Breakfast साठी hall मधे आलो. Maggi आणि खीर असा बेत होता. ट्रेकला जास्त काही expect करायचे नाही. ट्रेक आणि पिकनिकमधे हाच difference आहे.  Maggi आणि खीर, दोन्ही गरम आणि करायला सोपे. 

Breakfast होतोच आहे तर पुढची शिट्टी वाजली. हो शिट्टीच. Trekkers ना discipline लावण्यासाठी. Packed lunch मधे rice होता. बरोबर thermos मधे गरम पाणी भरून घेतले आणि बॅग pack केली. एव्हाना बरेचसे trekkers बॅग घेऊन ready होते. हॉस्टेलच्या आवारात ५० सीटर बस उभी होतीच. 

Instructor नी head-count घेतला आणि सगळे बस मधे बसलो. उत्तरखंडच्या रस्त्यांची साधारण ओळख होतीच. आणि drivers च्या skills ची सुद्धा 😜. 

मोठ्या rucksacks बसच्या टपावर ठेवल्या आणि मोजके सामान घेऊन सगळे बसमधे बसलो. बस सुरु होताच गणपती बाप्पा मोरया, शिवाजी महाराज की जय, जो बोले सो निहाल.... अश्या सगळ्या भाषेतल्या आणि regions च्या घोषणा झाल्या. बसचा प्रवास मसूरीतून सुरु होता. मसूरी आधी २ वेळा पाहिले होतेच.  ३०-४० मिनिटांत मसूरी cross केले आणि आता घाट-रस्ता सुरु झाला.  

As usual बस मधल अर्ध पब्लिक गाढ झोपेत होत आणि अर्ध (बे)सुरात गाणी गात होत 😆 थोड्यावेळात मीही झोपलो. 

वाटेत साधारण १०-११ ला बस पुरोला market मधे आली. काहीजणाना waterproof shoes, sun-glass वगैरेचे  shopping करायचे होते. पुरोला हे शेवटचे market होते. सांकरीपर्यन्त सगळी छोटी गावे. सांकरी सुद्धा छोटेसेच गाव. केदारकांठा आणि हर-की-दून ट्रेकचा base-camp असल्याने जरा महत्वाचे.  हर-की-दून ट्रेकचा रस्ता heavy snowfall  मुळे बंद झाला होता. उत्तरखंड government ने हा ट्रेक म्हणूनच बंद केला होता. 

१२-१ पर्यन्त आम्ही आमच्या lunch-point ला पोचलो. मस्त जंगलातून जाणारा रस्ता. Pine trees सगळीकडे.  बसमधून उतरलो. पाय मोकळे झाल्याने खरच बरे वाटले. रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या जरा चढावावर जाउन बसलो आणि packed lunch खाल्ला. परत पुढचा प्रवास सुरु. पोट शांत झाल्याने मस्त झोप लागली. 

मधेच गाणी मधेच झोप असा माझा प्रवास सुरु होता. संध्याकाळी ५:३०-६ ला एकदाचे सांकरी गावात आलो. हिमालय, त्यात हिवाळा. काळोख पडायला सुरुवात झालीच होती. मसूरीपेक्षा थंडी नक्कीच जास्त होती. YHAI च्या कॅम्प मधे शिरताच गरमागरम चहा आणि खारे शेंगदाणे मिळाले. तेवढीच energy आली.

Entering Sankri 

थोड्यावेळात YHAI च्या volunteers नी आमच्या tents ची व्यवस्था करुन दिली. Sleeping bag, Rucksack आणि blanket मिळाले. जरा कुठे tent मधे आराम करायला जातोय तेव्हढ्यात dinner ची वेळ झाली. इथे dinner म्हणजे ७-७३०.  Dinner होताच campfire सुरु. आमच्या आधीची batch KK-7 आणि केदारकांठा करून परत आलेली batch KK-3 आणि आमची KK-8 असे १०० एक जण जमले. मस्त धमाल झाली. Campfire संपताच tent कडे वळलो. पटकन डोळा लागला.

सकाळी ६ ला उठालो. आज YHAI च्या schedule नुसार morning exercise आणि acclimatization ट्रेक होता. Exercise ? बापरे! अस वाटल की कुठे military camp मधे भरती साठी आलोय. पण जरा बरच झालं. कोण किती पाण्यात आहे तेच कळते. ट्रेक आला की basic fitness हवाच. पुढे breakfast करुन KK-7 ला flag-off केलं आणि आमचा acclimatization ट्रेक सुरु झाला. दीड - दोन तासात छोटासा डोंगर आणि थोड़ी झाडी पार करुन एका छोट्याश्या डोंगरमाथ्यावर आलो. इथे introduction round झाला. ५० जणांची नाव लक्षात नक्कीच राहणार नव्हती. पुढील ट्रेकसाठी गणेश आणि अपूर्वची lead/co -lead तर अमृताची Environment lead म्हणून voluntarily निवड झाली. तसे बरोबर local guides होतेच, तरीपण group चा १ representative म्हणून. Environment lead ची जबाबदारी म्हणजे campsite वर आणि ट्रेक वर कुठे कचरा आणि घाण होउ न देणे. तशी ही जबाबदारी सगळ्यांचीच. थोडे फोटो आणि group फोटो काढले आणि परत campsite च्या दिशेने descend सुरु केला.

Acclimatization Trek 

संध्याकाळी सांकरी गावात आणि मार्केट मधे round मारली. काही जणांनी waterproof  shoes , poncho  वगैरेचे शॉपिंग केले. परत camp मधे आलो. काही सामान offload करुन rucksack पॅक केली. Offload म्हणजे नको असलेले सामान base-camp वर सोडायचे आणि ट्रेक complete करुन आलो की परत घ्यायचे. ह्याचा फायदा की ४-५ दिवस ट्रेकला कमीतकमी सामन carry करायचे. तेवढेच जरा कमी ओझे.

Dinner नंतर campfire. Campfire मधे यावेळी आमची turn. मग काय, एका मागून एक जोरदार performances. ग्रुपचे बारसे झाले.  "KK-८ Spartans".  ग्रुप मधेच काही कवी, गायक, वादक सापडले. 😄 "जय जय महाराष्ट्र माझा" म्हणत campfire चा शेवट केला.

खरी सुरुवात उद्या होती. सांकरी ते जुड़ा का तालाब.

To be continued.
पुढील भाग लवकरच 😊

Post a Comment

1 Comments

  1. Great article. For more amazing destination you can check this - https://instatravelstyle.com/visit-uttarakhand/

    ReplyDelete