जुडा का तालाब ते लुहासू
आज trek चा दुसरा दिवस. सकाळी ६ ला उठलो. छान झोप लागली. हिमालयन trek वर मनासारखी झोप लागणे म्हणजे तुम्ही acclimatize झाला आहात. Brush वगैरे करुन fresh झालो. चहा मिळताच बरे वाटले. थंडी कमी होत होती. तरीसुद्धा अंगावर ४ layers होत्या. Down Jacket चा नक्कीच फायदा होत होता. Breakfast होताच packed lunch आणि गरम पाणी भरून घेतले. आपले जरी सगळ्यात आधी आटपले तरी schedule नुसारच campsite सोडायची असते. थोडा वेळ होता हातात. जवळच थोडे फोटो, सेल्फी, video shoot केले.
Camp leader नी शिट्टी वाजवताच आधी blankets आणि sleeping bags परत केल्या आणि tent स्वच्छ केला. Rucksack pack केली. एव्हाना थंडी जरा कमी झाली होती. ८-८:३० झाल्याने कोवळा सूर्यप्रकाश होता. अंगावरच्या layers कमी केल्या. Camp leader नी आजच्या दिवसाच्या trek ची कल्पना दिली. जुडा का तालाब, तिथे halt आणि photography, लुहासू पर्यंतचा trek वगैरे. त्यांच्या शुभेच्छा घेत आम्ही दुसऱ्या दिवसाच्या trek ची सुरुवात केली.
Campsite च्या मागील बाजूने थोडे चढून वर आलो. इथे दुसऱ्या private group चे tents होते. Tent सोडून बाकी सगळीकडे बर्फ. आता हळूहळू trail वर सुद्धा बर्फ होता. Forclaz shoes ने चांगली grip दिली. काही काही जणांनी घसरून पडण्याचा श्री गणेशा केला. असच चालत, पडत, एकमेकांना आधार देत trek सुरु होता. साधारण २०-२५ मिनिटांनी जुडा का तालाब वर आलो.
समोरचा view बघून अक्षरशः तोंड उघडेच राहिले!
Entering जुडा का तालाब Courtesy : Yogesh |
जुडा का तालाब |
Lake च्या एका बाजूने चालत चालत दुसऱ्या टोकाशी गेलो. इथुन दिसणारा view तर अजून थक्क करणारा होता. Frozen lake, त्यामागे pine trees, बर्फाच्छादित शिखरे आणि ह्या सगळ्याचे त्या lake च्या बर्फावर पडणारे reflection. अवर्णनीय !
जुडा का तालाब |
जुडा का तालाब |
Landscape फोटो काढून झाल्यावर थोडे portraits काढले. आणि काढूनही घेतले. तेव्हढेच DP आणि cover pic चे collection 😂. Halt तसा बऱ्यापैकी मोठा होता. बाकीचे groups पुढे निघाले होते. आम्ही सुद्धा निघायची तयारी करत होतो. तेव्हढ्यात guide ने सांगितले आपल्या group ला अजून वेळ आहे. इथे groups चे guides जरी वेगळे असले तरी त्यांचे आपापसात co-ordination असते. कोणता group कधी निघणार, त्यांचा halt कुठे, किती वेळ halt घेणार वगैरे.
साधारण १०:३०-११ ला परत पुढील trek सुरु केला. आता जुडा का तालाब मागील बाजूस आणि खाली होता. Trail वरचा view तोच. उंचचउंच pine trees आणि सगळीकडे बर्फ. १२-१२:३० ला एक halt घेतला. Lunch break. Rucksack जमिनीवर टाकून समोर पडलेल्या ओंडक्यावर बसलो आणि जेवलो.
थोड्यावेळात परत ascend चालू केला. आता पुढील halt म्हणजे लुहासू campsite. Trail आता हळूहळू अरुंद होत होता. त्यात समोरून केदारकांठा करून परत येणारे trekkers. समोरून कोणी आले, की त्यांना आधी जाऊ द्यायचे, मग आपण पुढे असा प्रवास सुरु होता. त्यात भर म्हणजे खेचरे (mules). ती येणार म्हणजे आपण डोंगरच्या बाजूला उभे राहायचे आणि रस्ता मोकळा करायचा. अशातच एकदा मी आणि यश खेचरांच्या ह्या चकमकीतून थोडक्यात निसटलो 😅.
वाटेतील खेचरं (mules) Courtesy : Bhaskar | |
On the way to लुहासू Courtesy : Girish |
आता समोर campsites मधले tents दिसत होते. YHAI म्हणजे हिरवे, मोठे, १०-१२ माणसांचे tents. ओळखायला सोप्पे. पण जे दिसत होते ते सगळे private groups चे २-३ जण राहतील असे. पुढे गेल्यावर १ waterfall होता. त्याच्या बाजूने अगदी अरुंद वाटेवरून पुढे चालत गेलो. जरा सांभाळूनच. एका बाजूला डोंगर, सगळीकडे बर्फ. आणि दुसऱ्या बाजूला ४०-५० फूट खोल दरी. ह्या trek मधला थोडा "adventurous" भाग होता हा 😀. पुढे ४ पावलांवर लुहासू campsite आली.
Camp leader नी स्वागत करत site ची माहिती दिली. Ladies चे tents, kitchen, staff चे tent एका बाजूला आणि boys चे ४ tents थोड्या मागील बाजूला जास्त उंचीवर. Campsite ही पूर्णपणे बर्फात होती. बर्फाच्या जाड लाद्या होत्या. त्याच्यावर tents लावलेले. Tent मध्ये एक जाड प्लास्टिकची ताडपत्री. जेणेकरून बर्फाचा ओलावा आत नाही येणार. त्यावर sleeping mat आणि अजून १ कापडाची layer. एवढे झाल्यावर आमची ब्लँकेट्स, sleeping bags. रात्री नक्कीच "हालत" होणार होती.
Inside the tent at लुहासू |
View from लुहासू campsite |
चहा आणि सूप नंतर camp leader नी उद्याचा कार्यक्रम सांगितला. उद्याची सुरुवात २:३०-३ ला होणार होती. हो पहाटेचे. कारण असे की, केदारकांठा top वर sunrise च्या आधी पोहोचायचे होते. ५:३० ला आज dinner. गुलाबजाम चा बेत होता😋. थंडी चांगलीच वाढली होती. इथले रात्रीचे जास्तीतजास्त तापमान म्हणजे - १० डिग्री. आधीच अंगावर thermal घातल्याने ५ layers होत्या. सोबत windcheater ची जोडी होती. आज झोप लागेल का नाही, किती थंडी असेल, उद्याचा final ascend होईल ना, वगैरे ची थोडी काळजी आणि उत्सुकता घेऊनच tent मध्ये शिरलो.
To be continued
पुढील भाग लवकरच
1 Comments
Superb !!! Keep writing and keep inspiring !!
ReplyDelete