केदारकांठा Summit
१२:३०-१ वाजल्यापासूनच tent मध्ये आणि आजूबाजूला हालचाली चालू झाल्या. काल संध्याकाळी ६:३०-७ ते रात्रीचा १.. मस्त झोप लागली. आमच्या tent मध्ये ४-५ जण "घोरकरी" 😂. मी सुद्धा. बाकीच्यांची झोपमोड करून आम्ही मस्त ताणून दिली होती, तेही लुहासूचे तापमान -१७ डिग्री असताना.
१:३० वाजेपर्यंत सगळेच उठले. अजून जरी camp leader ची शिट्टी वाजली नसली तरी सगळे जण excitement मुळे आधीच तयार होते. अंगावर ५ layers होत्याच. वरून windcheater आणि त्याची पायातली जोडीही घातली. पुढे trail वर १-२ फूट बर्फ असण्याचे संकेत होते. त्यात आमच्याकडे "gaiters" नव्हते. Gaiters पायात अडकवले की तुमचा पाय १-२ फूट बर्फात गेला तरी कपडे भिजण्याची चिंता नाही. Gaiters नाही म्हणून मी windcheater च्या pant चा उपयोग केला.
Summit वर जाताना फक्त valuables, कॅमेरा आणि इतर गोष्टी न्यायच्या होत्या. बाकी rucksacks camp leader कडे submit केली. २:०० च्या आसपास breakfast केला. Maggi आणि उकडलेली अंडी. २:३० च्या आसपास leader नी शिट्टी वाजवली. आज आमच्या local guide बरोबर एक technical guide होता. त्याचा नाव होता टारझन. हो टारझन. त्यानेच अशी ओळख करून दिली.
३:०० पर्यंत आम्ही ascend सुरु केला. डोक्यावर torch अडकवली आणि त्या प्रकाशात चढण सुरु केली. आमच्या KK-8 batch च्या ५० जणांव्यतिरिक्त बाकीचे private groups सुद्धा ह्याच वाटेवरून जात होते. वाट म्हणजे सगळीकडे बर्फ, उंच pine trees किंवा रात्रीचा काळोख. असाच ascend चालू होता. काही ठिकाणी मधेच थोडा slippery patch तर कधी मध्येच फूटभर बर्फ.
Base camp वर camp leader नी सांगितले होते की trek करताना wild life चा experience मिळू शकतो. Snow Leopard, Bears, Wild Boar वगैरे. आम्हाला फक्त त्यांचे ठसे दिसले. Trekkers च्या एवढ्या गर्दीत कोणता प्राणी येणार 😋. मग आम्ही पण ते ठसे बघुन आमच्यातला wild life expert जागा केला. "हे ठसे ताजे आहेत", "snow leopard त्या दिशेला गेला असेल".
अशीच तास दीड तास चढण झाल्यावर एक चहाची टपरी आली. चला. जरा halt आणि relax होण्याचा वेळ.
थोड्यावेळात परत ascend चालू . या वेळी जरा steep ascend होता. त्यात एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला दरी. डोंगराला वळणं घेत चढणं चालू होतं. आतापर्यंत साधारण २.५ -३ तास trek झाला होता. केदारकांठा म्हणजे १२५०० फूट उंची. थकवा आणि oxygen ची कमतरता हळूहळू जाणवत होती.
प्रत्येक trekker विचारात होता "अजून किती वेळ". त्यावर guide चे उत्तर एकच "बस आ गया सर". सह्याद्रीतल्या trek प्रमाणेच "बस ५ मिनिट और" असे म्हणत २०-२५ मिनिटं trek चालू होता. आता बऱ्यापैकी उंची गाठली होती. डाव्या बाजूला पूर्व दिशेला काळोख कमी होत आता सोनेरी रंगाची छटा येत होती. आता केदारकांठाचा top दिसत होता. पण चढण अजून कठीण झाली होती. मध्येच बर्फ, मध्येच दगड, थोडी माती आणि तीव्र चढण.
एकदाचा top वर पोचलो. अजून सूर्योदय व्हायचा होता. पण जे दृश्य होते ते वर्णनापलीकडचे.
धुक्यात हरवलेले हिमालय |
Kedarkantha summit |
आधी अनेक सूर्योदय पहिले आहेत. पण हिमालयात, एखाद्या शिखरावरून पाहिलेला सूर्योदय म्हणजे एक वेगळाच अनुभव.
Sunrise from Kedarkantha |
केदारकांठाच्या top वरून दिसणारी स्वर्गारोहिणीची शिखरे, बंदरपूंच आणि कालानाग शिखरे आणि चारही बाजूना अथांग पसरलेले हिमालय. ४ दिवस केलेला trek, त्याआधी २-३ महिने घेतलेली मेहनत, सगळे सार्थकी लागले. हिमालयन trek मध्ये summit/top ला पोहोचल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. वर्णन कारण्यापलीकडले. त्यात एक "sense of achievement" असते.
Trekkers on top of Kedarkantha |
एक रीत अशी की तुम्ही जेव्हा एखादे शिखर सर करता, तेव्हा तुमच्या देशाचा झेंडा तिथे फडकवायचा. ह्याची तयारी आमच्या KK-8 ने आधीच केली होती.
KK-8 with Tri Colour Courtesy : Pranab |
Photo session , videos आणि सेल्फी काढून झाल्यावर थोडं बसून बरोबर असलेला थोडा सुकामेवा आणि बिस्किटं खाल्ली. काही जणांनी तिथे असल्येला शंकराच्या छोट्याश्या देवळात जाऊन दर्शन घेतले. आता पुढील टप्पा म्हणजे descend. Ascend हा सोप्पा असतो, descend मध्येच जास्त त्रास असतो. त्यात ज्या वाटेनं चढून, पकडून, मधेच घसरत आलो त्या वाटेने आता उतरायचे ह्या विचारानेच अर्धे जण tension मध्ये. मी सुद्धा. पण guide ने सांगितले की उतरायची वाट वेगळी आणि सोप्पी आहे. नशीब.
आता हळूहळू descend सुरु केला. ह्या वाटेने चढून येणारे काही private groups चे trekkers दिसले. Descend नक्कीच सोप्पा होता. पहिला patch म्हणजे जरा खडकाळ माती आणि थोडा बर्फ.
Descending from Kedarkantha |
हा patch पूर्ण होताच guide ने सांगितले की आता बर्फावरून slide करायचे आहे. मग काय मज्जाच. एका मागोमाग एक सगळे slide करत खाली आलो. काही smoothly आले. काही हात पाय हलवत. पण आले सगळे. अशीच परत १ slide करून पुढील descend चालू केला.
Ascend करताना जी चहाची टपरी होती, तिथेच ही वाट येऊन मिळाली. इथे परत एक break. सगळे येईस्तोवर जरा आराम केला, photo काढले. आता परत ज्या वाटेने आलो, तीच उतरायची होती. फरक एवढाच की रात्री trail वरचा कडक बर्फ आता हळूहळू वितळू लागला होता. त्यामुळे घसरणे आलेच.
Descend back to Luhasu campsite Courtesy : Girish |
ह्या patch मध्ये कोण किती वेळा घसरून पडले ह्याचा count नाही 😂. सांभाळत, आधार घेत एकदाचे लुहासू camp वर पोचलो. मस्तपैकी ऊन पडले होते. Lunch होताच rucksack उचलल्या आणि परत descend सुरु केला.
पुढील camp होता अरगाव. लुहासू पासून descend सुरु केला तो त्या वाटेनेच जिथून वर चढून आलो होतो. पुढे जाऊन थोड्यावेळाने मुख्य वाटेला फाटा फुटून आमची चाल अरगावच्या दिशेने सुरु झाली. उतार तास सोपा होता. आणि trail मधेच सरळ, मधेच नागमोडी वळणे घेत होता. एक त्रास नक्कीच होता तो म्हणजे बर्फ वितळून आता सगळा चिखल झाला होता. काही ठिकाणी तर पूर्ण पाऊल चिखलात बुडेल एवढा! बर्फावर चालणे परवडले असा हा चिखल.
हळूहळू उतरत ३:०० पर्यंत अरगाव campsite वर पोचलो. Camp leader नी स्वागत केले तेच चहा आणि बटाटे वड्यांनी! वा ! १०-१२ तासांच्या trek नंतर अशी मेजवानी. संध्याकाळी ६:३०-७ ला dinner नंतर मस्त झोप लागली. उद्या उठायची घाई नव्हती.
To be continued
पुढील भाग लवकरच
0 Comments