Himalayan Trekking Expedition to Kedarkantha : भाग १

मे २०१७ मध्ये रुपकुंड ट्रेक करून झाला होता. विचार करत होतो कि आता एखादा विंटर ट्रेक सुद्धा करू. हिमालयन ट्रेकची तशी माहिती होती आणि आता एक्सपेरिअन्स आला होता. सह्याद्रीतले माझे मान्सून ट्रेक्स सुरु झाले होते.

२-३ आठवडे माहिती काढत होतो की कुठचा ट्रेक करावा. केदारकांठा आणि सांदकफू हे ट्रेक्स तसे easy to moderate category मधले दिसत होते.  YHAI , India Hikes च्या वेबसाइट्स वर माहिती शोधत होतो. दोन्ही कडे डिसेंबर - जानेवारीच्या batches दिसत होत्या. सगळी itinerary वाचून घेतली. १-२ मित्रांकडून सुद्धा माहिती करून घेतली. दोन्ही ट्रेक्स किती कठीण आहेत? मला जमतील का? बर्फ मिळेल का? फोटोग्राफीसाठी कसा आहे?

डिसेंबर मध्ये ख्रिसमसची सुट्टी असल्याने तशी जास्त अडचण नव्हती. सुट्ट्या, तारखा आणि बजेटचा मेळ घातला आणि शेवटी YHAI च्या केदारकांठा च्या 22nd डिसेंबरच्या batch चे बुकिंग केले.

As usual 10-12 मित्रांना WhatsApp केले होते. "Are you joining me?" अपेक्षेप्रमाणे reply आले. "नाही जमणार.", "सुट्ट्या नाहीत रे". At least reply तरी आले. शेवटी ह्या वेळी सुद्धा मी एकटाच. असो. 

ट्रेक बुक झाला होता. आता रेल्वे आणि flight चे booking करायचे होते. Trekking चा Reporting point "मसूरी Youth Hostel" होता. मसुरी म्हणजे मुंबई ते दिल्ली flight. मग Old Delhi रेल्वे स्टेशन वरून "Mussoorie Express" ने डेहराडून आणि तिथून बस/टॅक्सी/जीप जे मिळेल त्याने मसुरी. 

साधारण नोव्हेंबर महिन्यात Down jacket, hand-gloves आणि Forclaz shoes साठी ठाण्याच्या Decathlon मध्ये फेरी झालीच. रोज चालण्याची आणि धावण्याची सुरवात आधीपासूनच झाली होती.  मुंबईहुन निघण्याची तारीख २१ डिसेंबर होती. जशी तारीख जवळ येत होती तशी excitement सुद्धा वाढत होती.

२१ डिसेंबरला एकदाचा मुंबईच्या T2 वर पोचलो. Flight delay मुळे दिल्लीला येईपर्यंत साधारण संध्याकाळचे ७ वाजले. मेट्रोने Old Delhi रेल्वे स्टेशन गाठले आणि पावणे १० ला Mussoorie Express पकडली. सकाळी साडेसातला डेहराडूनला आलो. थंडी जास्त नव्हती. स्टेशन च्या बाहेर बससाठी चौकशी केली. बसचा काही पत्ता नव्हता म्हणून मग समोरच्या टॅक्सी स्टॅन्डकडे वळलो. तिथून मसुरी ला निघालो. Finally साडेदहा अकरा च्या सुमारास मसुरीच्या Youth Hostel मध्ये पोचलो. मुंबईहून हिमालयन ट्रेकच्या base-camp ला पोहोचणे हाच मुळात छोटा ट्रेक आहे. 😁

Youth Hostel च्या reception वर सगळी documents आणि फोटो दिले आणि माझ्या रूम मधे आलो. रूम बऱ्यापैकी मोठी होती. रूम पेक्षा dormitory च. दहा एक bed होते. अजुन तरी जास्त  गर्दी  दिसत नव्हती. Batch size 50 होती, तरी अजुन boys मधे फक्त १०-१२ जण आले होते. ट्रेकला एकटा आल्याचा फायदा म्हणजे आपण कोणत्या एक group मधे नसतो. इथे सगळेच सारखे. बोलता बोलता Thiru आणि Anuj शी ओळख झाली.  Lunch दुपारी १ ला होता, म्हटले जरा आसपास एक फेरी मारुन येऊ. आम्ही  ४-५ जण कॅमेरा आणि valuables घेऊन बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या Mussorrrie Lake (मसूरी झील) ला जाउन आलो. लेक बद्दल लिहिण्यासारखे काहीच नाही.जरा निराशाच झाली.

View from Youth Hostel, Mussoorie 
दुपारचे जेवण झाल्यावर मी मस्त झोप काढली. संध्याकाळी ४-५ वाजता चहा मिळाला. तो पर्यन्त बऱ्यापैकी गर्दी जमली होती. मुंबई, पुणे, बंगलोरच पब्लिक जास्त होत. Youth Hostel च्या आवारातच एक फेरफटका मारला. एव्हाना थंडी वाढली होती. मस्तपैकी sunset चे फोटो काढून घेतले आणि परत dormitory मधे आलो.

Night in Mussoorie, a view from Youth Hostel

रात्री जेवणानंतर YHAI च्या instructor नी पुढील दिवसाची idea दिली.आमच्या batch ला काही freshers (ज्यांचा हा पहिलाच ट्रेक होता असे ) होते. Experienced सुद्धा होते. उद्याचा दिवस सगळा प्रवास होता. ७-८ तास. त्यात road journey. मसूरी ते सांकरी.


To be continued

Post a Comment

1 Comments

  1. सुरवात interesting झाली आहे!
    मला इतके दिवस वाटायचं फक्त मैत्रिणीच नाटकं करतात, पण आजच कळलं मित्र सुद्धा टांग देतात!! ;)

    ReplyDelete