Sydney Diaries भाग 1 : सिडनीची ओळख आणि Opera House

सिडनीची ओळख आणि Opera House

१६ जून २०१८, रात्री साधारण ८३०-९ ला सिडनी एअरपोर्ट वर land झालो. इमिग्रेशन आणि luggage हाती येईस्तोवर ९ वाजले होते. तशी माझी ही तिसरी परदेशवारी. सिंगापुर, थायलंड, मलेशिया आणि युरोपच्या "टूर्स " केल्या होत्या. कामासाठी पहिल्यांदाच असा बाहेर. आमच्या IT च्या भाषेत म्हणायचं झाल तर पहिल्यांदाच onsite.

एअरपोर्टवरून बाहेर येताच आधी Optus कंपनीचे sim card घेतले. India outgoing फ्री असल्यामुळे चांगली सोय झाली. Sim कार्ड घेऊन बाहेर पडलो taxi शोधायला. एअरपोर्ट वर अजिबात गर्दी नव्हती. प्रवासी सुद्धा कमी. टॅक्स्या पण अगदी २-४. जरा वेगळंच वाटलं. म्हटलं आज ऑस्ट्रेलियाची FIFA WorldCup मधे match आहे म्हणून इथे गर्दी नसेल. हवेत गारठा नक्कीच होता. जूनचा पहिला पंधरवडा म्हणजे तसा मुंबई मध्ये उन्हाळाच. इथे जून ते सप्टेंबर winter season. ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात असल्यामुळे आपल्या भारताच्या अगदी उलटे ऋतू. म्हणजे आपल्याकडे जेव्हा थंडी तेव्हा इथे उन्हाळा.असो.

टॅक्सी मिळताच माझे हॉटेल गाठले. टॅक्सीचे भाडे झाले साधारण ६०-६५ ऑस्ट्रेलियन डॉलर्स. १ ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे साधारण ५०-५१ भारतीय रुपये. माझे हॉटेल एअरपोर्ट पासून ७-८ किलोमीटरवर. टॅक्सी प्रवासाला लागला २० एक मिनटे वेळ. लगेच माझ्या डोक्यात AUD to INR conversion सुरु झाले. म्हणजे पहिलाच प्रवास आणि ते ही तीन-साडेतीन हजार रुपये खर्च! पण मला काळजी नव्हती. मी official work साठी इथे आलो होतो 😉.

टॅक्सी मधून हॉटेल येईस्तोवर मी उगाच google maps वर रस्ता पाहत होतो. Curiosity पण आणि आपल्या surrounding ची माहिती व्हावी म्हणून. Meriton हॉटेल येईस्तोवर रात्रीचे ९:३० झाले होते. Reception वरील सोपोस्कर उरकून माझ्या रूमची चावी घेतली. रूम सदतिसाव्या मजल्यावर! हॉटेल मध्ये एकूण ५५-६० काहीतरी मजले!

माझी onsite वारी ३ महिन्याची म्हणून १ स्टुडिओ अपार्टमेंट घेतली होती. म्हणजे नेहमीसारखीच हॉटेलची रूम, फक्त त्यात kitchen, laundry वगैरे facilities जास्तीच्या. लगेच रूम मधे कुठे कुठे काय काय आहे हे पाहून घेतले. घरी लगेच Whatsapp केले. नाही तर आईला उगाच काळजी 😅 बेड वर पडताच ठरवले की जाग येईल तेव्हा उठायचे. १५-१६ तासाच्या विमान प्रवासाचा आता नक्कीच थकवा जाणवत होता. जाड ब्लॅंकेट अंगावर घेताच गाढ झोप लागली.

सकाळी जाग आली तेव्हा पावणे बारा वाजले होते. आंघोळ वगैरे उरकून जरा फ्रेश झालो. कॉफी घेताच जरा बरे वाटले. पण अजून भूक काही लागली नव्हती. Jetlag हळूहळू जाणवत होता. थोड्याच वेळात colleague चा फोन आला की तो अर्ध्या तासात Town Hall स्टेशन च्या इथे येतोय. मग काय, अंघोळ वगैरे उरकून हॉटेल वरून बाहेर पडलो ते हातात google maps चालू करून 😁

Town Hall स्टेशन म्हणजे सिडनी CBD मधले एक मेट्रोचे स्टेशन. माझ्या हॉटेल पासून ८-१० मिनिटे चालतं. स्टेशनच्या बाजूलाच जुन्या वास्तुशैलीतला Town Hall आहे. त्याचा बाजूलाच underground स्टेशन. थोड्याच वेळात colleague येताच आम्ही फिरलायला पुढे निघालो.

सिडनी Town Hall 
Town Hall वरून पुढे जाताच Victoria Building, George Street चालत चालत आता आम्ही Pitt Street वर आलो. Pitt Street म्हणजे एक जत्राच. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्सची दुकाने, शोरूम्स. बाजूलाच Sydney Tower Eye. रस्त्याच्या वर lighting आणि थोडे decoration. मधेच कोणीतरी गिटार वाजवत गाणं गातोय, त्याच्या बाजूला लोकं घोळका करून उभे. कोणी मधेच त्या artist च्या समोर डॉलर टाकून जाई , कोणी तोच क्षण "Instagram live" साठी रेकॉर्ड करतय. मजा आहे.

असेच पुढे चालत चालत आम्ही Circular Quay स्टेशन च्या जवळ आलो. आता हे स्टेशन elevated होते. स्टेशन पार करताच Opera House आणि Harbor Bridge दिसला! सिडनीची तशी ओळख म्हणजे ह्याच दोन गोष्टी! लगेचच बॅगेतून माझा कॅमेरा काढला आणि फोटोग्राफी सुरु केली. तसा मी सिडनी मध्ये ३ महिने राहणार होतो. त्यामुळे उगाच फोटो काढायची घाई केली नाही. तसेही हे एवढे मोठे opera house एवढ्या जवळून फोटो मध्ये काही खास दिसणार नाही. पण साधारण light आणि दिशांचा अंदाज घेत आणि वेळेची गणिते मनात करून ठरवले की चांगला फोटो कधी आणि कुठून काढता येईल ते. तेवढीच फिरायची अजून opportunity 😆

सिडनी CBD 
एका बाजूला harbor bridge आणि दुसऱ्या बाजूला opera house आणि मधेच चालायला जागा.आपल्या marine drive ला आहे तशी. मागील बाजूस सिडनी CBD चे sky scrappers उभे. Opera House च्या खालीच भरपूर हॉटेल्स आणि bars. मग अशीच एक जागा शोधून गप्पा मारत मधेच बसलो. बघता बघता काळोख व्हायला लागला. म्हटलं आता निघूया, पण मोबाईल बघतोच तर आत्ताशी फक्त ५:३० वाजलेत! मग लक्षात आले. आत्ता इथे हिवाळा, म्हणून रात्र लवकर. पण ५:३० म्हणजे आपल्या मुंबईकरांना अगदीच लवकर. पण काळोख होताच थंडी पण चांगलीच वाढली.

सिडनी Harbor Bridge आणि मी  
आता एवढ्या लांब सिडनीला आलोय आणि ते ही Opera House बघायला, म्हणजे photoshoot पण करून घेणारच. मग नंतर दहा - एक मिनिटांत तिथून निघालो ते circular quay स्टेशन वर ट्रेन पकडायला. सिडनी मेट्रो म्हणजे आपल्या मुंबई मेट्रो पेक्षासुद्धा छान. म्हटलं तर हा माझा पहिलाच प्रवास. पण first impression तरी नक्कीच छान होते.  पुढे ८-१० मिनिटांत town hall स्टेशन आले. तिथेच Woolworths ह्या departmental store मध्ये थोडी खरेदी करून पुढे ५-६ मिनिटातच लगेच हॉटेल वर पोचलो. उद्या सोमवार. म्हणजे आता ऑफिसला जायची तयारी....

To be continued....












Post a Comment

0 Comments