Himalayan Trekking Expedition to Kedarkantha : भाग 6

परतीचा प्रवास 

आज उठायची घाई नव्हती. तरीही ६-६:३० पर्यंत जाग आलीच. आज trek चा शेवटचा टप्पा असल्याने सगळे जरा आरामात होते. Schedule जरी fix असले तरी आधीच्या camp सारखी घाई नव्हती. ७-७:३० पर्यंत आटपून सगळे ready झालो. पाणी वगैरे भरून घेतले. आज packed lunch नव्हता. आम्ही सांकरी camp, जिथून trek ची सुरुवात केली, तिथे lunch च्या आतच पोहोचणार होतो. म्हणजे साधारण ३ तास. ते पण संपूर्ण उतार. अरे वा!

८ वाजता camp leader च्या शुभेच्छा घेत आजचा trek चालू केला. अरगाव campsite ही आधीच थोडी उतारावर आणि clearing मध्ये होती. Campsite सोडताच परत pine trees चे जंगल. आज बर्फ नव्हता. त्यामुळे घसरून पडणे नाहीच. त्यात थंडी सुद्धा कमी. कमी म्हणजे केदारकांठाच्या -१७ पेक्षा नक्कीच कमी 😂 . 

आजचा descend म्हणजे डोंगराला छोटी वळणे घेत उतरत होतो. बर्फ नसला तरी माती होतीच. मधेच सुक्या पानांचा पाचोळा. त्याच्यावरून चालताना येणार आवाज. सकाळच्या वेळेत पक्ष्यांची किलबिल. कोवळं ऊन. एक प्रसन्न वातावरण होते. आमचा speed सुद्धा जास्त होता. सगळे भराभर उतरत होते. 

आम्ही उतरत असलेली वाट ही पुढे जाऊन परत मुख्य वाटेला मिळत होती जिथून आम्ही पहिल्या दिवशी चढून आलो होतो. Guide ने सांगितले की आता पुढचा halt तोच. मग काय सगळे भराभर चालू लागलो. वाट तशी सरळ होती. कुठे फाटे वगैरे नव्हते. मध्येच काही छोट्या झोपड्या दिसत होत्या. मध्येच खेचरं. 

तास दीड तासात clearing आले. इथेच आम्ही पहिल्या दिवशी halt घेतला होता. एव्हाना १०-१०:३० वाजले होते. बाकी सगळे येई पर्यंत थोडे relax झालो. photo-shoot , video , सेल्फी वगैरे चालू होतेच . 

Towards Sankri

१५-२० मिनिटं break घेतला आणि परत descend सुरु केला. ही वाट आता ओळखीची होती 😄. वाटेत केदारकांठाच्या दिशेने चढून येणारे trekkers होते. काही excited , काही इथेच थकलेले, काही सेल्फी घेत trek करणारे, काही गाणी वाजवत. काही जण आम्हाला विचारत होते, "पुढचा trek कसा आहे?", "मजा आली का?" , "अजून किती वेळ?" मला पहिल्या दिवसाचीच आठवण झाली, मी सुद्धा असाच चढत होतो. पण यावेळी फरक होता. केदारकांठा करून परत जात होतो. एक वेगळाच confidence होता. 

११:३०-१२ पर्यंत सांकरीच्या अगदी जवळ आलो. Campsite २ मिनिटांवर होती. पण तरीसुद्धा halt घेतला. कारण असे की campsite वर परत येताना सगळ्यांनी एकत्र यायचे. 

चला. trek पूर्ण झाला. YHAI ने trek वरून परत आलेल्यांची सोय एका tent मध्ये केली होती. Rucksack टाकताच जरा आडवा झालो. आता आराम. lunch करून झाल्यावर आधी कपडे बदलले. Tent च्या बाहेरच YHAI campsite चे fencing होते. त्याबाहेर गावातली काही लहान मुले खेळत होती. लहान मुले म्हणजे portraits साठी मस्त opportunity. 

Child playing cricket just outside of our tent, Sankri

आता dinner पर्यंत free time होता. ३-४ जण आम्ही, कॅमेरा आणि valuables घेऊन सांकरी गाव फिरून आलो. मनसोक्त photography केली.  बरोबरच उद्याच्या डेहरादूनच्या परतीच्या प्रवासाची चौकशी आणि व्यवस्था करून घेतली. 

Sankri situated amidst Himalayan mountains


Takeaway from Himalay, A dried Pine cone

Sunset च्या आत campsite वर परत आलो. Dinner नंतर campfire मध्ये KK-8 च्या participants ना certificates देऊन गौरवण्यात आले. काहीजणांनी trek चा feedback आणि अनुभवाचे दोन शब्द पुढच्या batches साठी दिले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठून rucksack भरली. चहा पिऊन आम्ही सगळे परत डेहरादूनच्या दिशेनं बस प्रवासाने निघालो. साधारण ७-८ तासाचा बस प्रवास. मग डेहरादून ते दिल्ली train ने आणि मग तिथून flight ने मुंबईला परत घरी. 

The End
समाप्त. 
PS : Do watch my video about the Trekking Expedition to Kedarkantha here :



Post a Comment

1 Comments

  1. क्या बात है!! आता मलाही जावंसं वाटतंय! Thanks for inspiring! And keep writing! Best Wishes! :)

    ReplyDelete