बरं, तर ह्या website वर ऑस्ट्रियामधल्या सगळ्या महत्वाच्या शहरांची वेगवेगळी packages. काही combo packages, म्हणजे एकाच टूर मध्ये ३-४ ठिकाणं फिरून यायची. मी सुद्धा अशीच काही tourist ठिकाणे निवडली. Sydney Tower Eye, SeaLife Aquarium, Wildlife Zoo आणि Madam Tussaud's Museum.
ही टूर अशी होती कि तुम्ही एकदा बुकिंग केले कि ७ दिवसांत सगळी ठिकाणे बघायची. आपल्या वेळेप्रमाणे. मग मी थोडं planning केलं. Sydney Tower Eye म्हणजे सिडनी मधील सगळ्यात उंच इमारत आणि इथून संपूर्ण सिडनी आणि आजूबाजूचा परिसर दिसतो. मी या आधी सिंगापूर आणि लंडनला अशीच "eye" पाहिली होती, त्यामुळे ह्याची एक साधारण कल्पना होती. मग ठरवलं ह्या Tower Eye ला आधी भेट देऊ, संध्याकाळी, सूर्यास्ताच्या आसपास, म्हणजे फोटो छान येतील आणि बाकीची ३ ठिकाणे जवळ असल्याने ती रविवारी बघू. म्हणजे weekend ला दोन्ही दिवस जरा time pass.
Sydney Tower Eye तसा माझ्या हॉटेल पासून १०-१५ मिनटं अंतरावर. तिथे ४ पर्यंत पोचलो. तिकीट online विकत घेतल्याने त्यासाठी वेगळी रांग लावावी नाही लागली. पुढे entry करताच जगातल्या अशाच इतर उंच towers ची उंची आणि त्यांची वैशिष्टये, आपापसांत केलेली तुलना यांची माहिती होती. बुर्ज खलिफा, Petronas Twin Towers, Empire state building वगैरे. त्या पुढे ह्या Sydney Tower ची काही माहिती. त्याची उंची, त्याचे बांधकाम कसे झाले, tower ची वैशिट्ये वगैरे.
|
Sydney Tower Eye |
आता ह्या tower च्या सगळ्यात उंच मजल्यावर जायचे म्हणजे लिफ्ट आलीच. इथे बऱ्यापैकी रांग होती. २ लिफ्ट होत्या. दोन्हीही माझ्यासारख्या tourists ना वर-खाली ने-आण करत होत्या. Tower च्या टॉप वर येईस्तोवर ५:१५ वाजले होते. एव्हाना सूर्यास्त होत होता. टॉवरचा सगळ्यात वरचा मजला म्हणजे एक मोठी gallery. गोल आकारची. म्हणजे इथून तुम्हाला सिडनी आणि आजूबाजूचे सगळ्या दिशेतले परिसर पाहता येतात. मग मी सुद्धा हळूहळू एक एक परिसर पाहू लागलो. बारांगारू; जिथे माझे ऑफिस होते, सिडनी CBD, Hyde पार्क, Opera House, Darling Harbor, Manly वगैरे उपनगरे पहिली.
|
Barangaroo seen from Sydney Tower Eye |
|
Sunset from Sydney Tower Eye |
इथूनच मग सूर्यास्त पहिला. इथे वेळेचे बंधन नव्हते. बऱ्यापैकी फोटो काढून घेतले. प्रत्येक २-४ फुटांवर असलेल्या दुर्बिणीमधून लांब दिसत असलेला परिसर न्ह्याहाळाला. एकूणच आज छान वाटले. जरा वेगळे. इथून परत खाली जायचे म्हणजे elevator साठी मी रांगेत उभा. हॉटेल वर येईपर्यँत रात्रीचे ८ वाजले. उद्याचा प्लॅन होता Wildlife Zoo, Aquarium आणि Tussaud Museum.
----
आज रविवार, २२ जुलै. सकाळी ९ ला उठून १० पर्यंत हॉटेलवरून निघालो ते Sydney SeaLife Aquarium पाहायला. हा भाग माझ्या हॉटेल पासून ८-१० मिनिटांवर. डार्लिंग हार्बर हे उपनगरचे नाव. इथे हे मत्स्यालय,प्राणी संग्रहालय आणि wax museum एकाच भागात बनवले आहे. म्हणजे साधारण ४-५ तासांत अगदी आरामात ह्या तीनही गोष्टी बघून होणार.
मी सुरुवात केली Aquarium पासून. आज Sunday म्हणून इथे families आणि लहान मुले ह्याची चांगलीच गर्दी! सुरुवातीला हे मत्स्यालय पण बाकीच्या इतर मत्स्यालयांसारखेच. वेगवेगळ्या प्रकारचे मासे, जलचर, सरपटणारे प्राणी वगैरे. पण पुढे गेल्यावर मात्र एकदम वेगळ्याच जगात आलो! एक बोगद्यासारखी जागा. आपण सरळ चालत राहायचे. दोन्ही बाजूला आणि आपल्या वर काच आणि त्या पलीकडे पाणी आणि त्यात मोठमोठाले मासे. म्हणजे आपणच एका छोट्या पिंजऱ्यासारख्या भागातून चालायचे.
|
Sydney SeaLife Aquarium |
|
Sydney SeaLife Aquarium |
हे मासे आणि इतर जलचर बघून बाहेर येतोच तो "Penguins" ची पाटी दिसली. तिथेच उभ्या असलेल्या एका कर्मचार्यांशी चौकशी केली असता कळले कि हे Penguinsअंटार्टिका वरून आणले आहेत. बरं तर हे ज्या काचेच्या पलीकडे आहेत, तिथून त्यांना आपण दिसत नाही. त्यांच्यासाठी हि काच म्हणजे एक आरसा. जेणेकरून ते human presence मुळे घाबरणार नाहीत.
|
Penguins at Sydney SeaLife Aquarium |
Aquarium मधून बाहेर आल्यावर मग मी माझा मोर्चा Zoo कडे वळवला. इथे भरपूर प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक, उभयचर. अगदी सगळ्या प्रकारचे पशु होते. जास्त भर ऑस्ट्रियामधल्या जाती-प्रजातींवर होता. साप आणि सरपटणारे प्राणी तर केवढेतरी. पण ऑस्ट्रेलिया म्हणजे २ प्राणी बघायलाच हवेत! कांगारू आणि कुआला. आता इथे कांगारू आणि "kangaroo family" मधले सुद्धा बरेच प्राणी. दिसायला बऱ्यापैकी सारखे. पण फरक नक्कीच जाणवतो. काही थोडे उंच, काही लहान, काहींचा रंग वेगळा वगैरे.
|
Yellow Footed Rock Wallaby |
कुआला म्हणजे पांडा सारखा प्राणी.😆 दिवसातले १६-१८ तास हे महाशय झोपून असतात. जिथे जागा मिळेल, ज्या अवस्थेत असतील तसेच झोपणार. बाकीचं ३-४ गवत आणि घासफूस खाणार. हेच त्यांचे आयुष्य. इथे सुद्धा बरेच लोक ह्या Kuala बरोबर selfie घेत होते. अर्थात zoo चे कर्मचारी सोबत होतेच. दोघांची काळजी घ्यायला.
|
Kuala at Sydney Zoo |
आता शेवटचा stop. Madam Tussaud's Museum. आता ह्या आधी मी लंडनचे original Madam Tussaud's Museum पहिले होते. त्यामुळे इथे जास्त excitement नव्हती. तरी बऱ्यापैकी ओळखीचे चेहरे दिसले. सेलिब्रिटींचे. स्पोर्ट्स प्लेयर्सचे. इतिहासातील प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी असे अनेक. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध लोकांचे पुतळे मला जास्त आवडले. इतर पुतळे तसे सगळ्याच ठिकाणी असतात.
|
CrChris Hemsworth, Hugh Jackman, Tim Cahill, Mahatma Gandhi, Eric Bana and Steve Irwin |
काही प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन व्यक्ती म्हणजे Chris Hemsworth, Hugh Jackman आणि Eric Bana, हॉलिवूड मधले हिरो. Tim Cahill, ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि Discovery Channel मुळे प्रसिद्ध झालेला Steve Irwin.
Tussaud's Museum बघून होईपर्यंत साधारण दुपारचे ३:३० वाजले होते. आज जरा वेगळं बघितल्याचा आनंद झाला होता.पेन्गविन्स, कांगारू, कुआला 😀 शेवटी wildlife फोटोग्राफीची आवड असणाऱ्याला अजून काय हवे.
To be continued...
0 Comments