Hyde Park आणि Botanical Gardens
सिडनीला येऊन आता आठवडा झाला होता. पहिल्याच आठवड्यात Opera House आणि Harbor Bridge पाहून झाल्यावर मग आता पुढची तयारी सुरु केली होती. Travelling ची. मुळात travelling, trekking आणि photography ची आवड खूपच. त्यात Sydney आणि Australia म्हणजे १ नवीन शहर, देश आणि खंड ! मग आता एवढया मोठ्या संधीचे सोने करायलाच हवे 😁
Travel करण्याचे ३ फायदे. Photography, videography आणि blogs. बाकी नवीन जागा बघणे, नवीन लोकांशी ओळखी हा सगळा बोनस.
गेल्याच आठवड्यात Opera House च्या इथे ठरवले होते की चांगली वेळ आणि जागा शोधून ह्या जागेचे फोटो काढायचे. पुढील ५ working days मध्ये अशाच जागा शोधत होतो. "Top 10 things to do in Sydney", "Top tourist attractions in Sydney", "Must visit places in Sydney" वगैरे इंटरनेटवरची articles चाळून झाली होती. मग हळूहळू अशी लिस्टच बनवायला लागलो कधी कुठे जायचे ते 😄
मग ह्या weekend ला, म्हणजे २४-२५ जून ला ठरवले कि Hyde Park आणि Botanical Gardens ची भटकंती करायची. कारण म्हणजे कुठल्या हि देशात जा, पार्क आणि गार्डन्स म्हणजे चांगली फिरायची जागा. फोटो साठी नक्कीच चांगली opportunity. परत ह्या Botanical Gardens च्या शेवटच्या टोकाहून Sydney CBD, Opera House आणि Harbor Bridge मस्त दिसतो.
२४ जून ला लवकर उठून अंघोळ वगैरे आटपून हॉटेलमधून बाहेर पडलो. आधी पोटपूजा. जवळच एका eatery मध्ये scrambled eggs, toast आणि coffee घेतली. Scrambled eggs म्हणजे कांदा-टोमॅटो आणि मसाला नसलेली भुर्जीच. ब्रेकफास्ट होताच google maps वर navigation चालू केले. तसा साधारण रस्ता आधी बघून ठेवलाच होता. माझ्या हॉटेल पासून साधारण १५-२० मिनिटांवरच हे Hyde Park होतं.
एव्हाना ९:०० वाजले होते. Winter season पण त्यात छान ऊन पडल्यामुळे मस्त वाटत होते. एकदम pleasant. १५-२० मिनिटांत Hyde Park जवळ आलो. Public place असल्याने entry fee नाही. पार्क तसे बऱ्यापैकी मोठे. मधेच कोणी लोक jogging करतायत, मधेच माझ्यासारखे photographers, तर काही लोकं नुसतीच बाकावर बसून. पुढे दोन पावलांवरच १ छोटं तळं होतं. Pool of reflections. बाजूलाच एका memorial चे बांधकाम आणि डागडुजी चालू होती.
Pool of Reflections |
ह्याचा समोरच्याच बाजूस एक लांबलचक चालायचा ट्रॅक आणि दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे. झाडांची कमानचं. पुढे अजून १० पावलांवर एक मोठं कारंज. मागे Sydney CBD चे sky scrappers डोकावत आहेत. मधेच Sydney Tower Eye दिसतोय असे मस्त दृश्य होते.
Hdye Park |
Archibald Fountain |
St. Mary's Cathedral |
St. Mary's Cathedral ला वळसा घालून सरळ चालत जाताच botanical gardens सुरु होतात. हि सुद्धा public place म्हणजे entry fee नाही. आता botanical garden म्हणजे माझ्या मनात आधीच एक चित्र तयार झाले होते. सगळीकडे वेगवेगळी झाडे, फुले, वनस्पती. त्याभोवती त्यांची scientific नावे आणि इतर माहिती. पण हे गार्डन वेगळंच होतं. तशी झाडांची, फुलांची, वेगळया वनस्पतींची माहिती आणि शास्त्रीय पद्धतीने लागवड केली होतीच. पण गार्डनचा बऱ्यापैकी भाग हा lawns आणि walking / jogging track ने व्यापला होता. बरं तर हा track सरळ नाही. बऱ्याच ठिकाणी ह्याला फाटे फुटणार. प्रत्येक फाट्यावर पुढे काय वाढून ठेवलाय ह्याची इथ्यमभूत माहिती.
मग असाच सरळ वाट पकडून चालत राहिलो. Google भाऊ होतेच सोबतीला. मग ठरवलं की garden च्या टोकाला जाऊ. कारण तिथून Opera House , Harbor Bridge आणि सिडनी CBD चा मस्त view दिसणार होता. Google Maps चा एक महत्वाचा फायदा म्हणजे कुठेही जायच्या आधी ती जागा आणि त्या जागेवरून दिसणारा view ह्याची आपल्याला साधारण कल्पना येते.
हा track बऱ्यापैकी लांब होता. १५-२० मिनिटे चालून garden च्या टोकाला आलो. पुढे खडकांवर लाटा आदळत होत्या. म्हणजे आपल्या मुंबईच्या बँड स्टॅन्ड सारखं. हा नक्कीच photogenic spot होता.
Opera House आणि Harbor Bridge |
Sydney CBD |
Opera House, Harbor Bridge आणि मी |
मनसोक्त फोटोग्राफी करून झाल्यावर मग मोर्चा botanical gardens च्या दुसऱ्या दिशेने वळवला. ह्यावेळी वाटेत ३-४ फाटे घेत, इथे तिथे फिरत २०-२५ मिनटं पायपीट केली. एकूणच ह्या garden चा उपयोग म्हणजे एक tourist spot तर होताच. पण locals साठी एक शांत निवांत जागा. ती सुद्धा शहरात. Weekend ला family outing साठी मस्त सोय.
असाच मग अजून पुढे फिरत फिरत gardens च्या exit पाशी आलो. तसे garden ला ४-५ exits. मी आलो तो होता अगदी opera house च्या मागील बाजूस. मग काय, अजून जरा वेगळे फोटो. वेगळ्या angle ने.
Opera House, Botanical Gardens च्या बाजूने |
To be continued....
0 Comments