Sydney Diaries भाग 4 : Kiama आणि Woolongong

Kiama आणि Woolongong

१५ जुलै. ह्या weekend चा प्लॅन आधीच झाला होता. Kiama आणि Woolongong beaches. सिडनी मध्येच स्थायिकझालेला, माझा ex colleague - रवी ह्याने सगळा प्लॅन केला होता. Kiama आणि Woolongong हे सिडनी पासून साधारण १२० किलोमीटर लांब. Kiama ची खासियत म्हणजे blowhole beaches. इथे समुद्रकिनाऱ्यालगत मोठमोठाले खडक. त्याला भलीमोठी छिद्रे. मग भरतीच्या वेळी लाटा इथे आदळल्या कि मग ह्या छिद्रांमधून खाऱ्या पाण्याचे मोठे कारंजेच हवेत उडते. म्हणून नाव blow - hole. 

सिडनी पासून कियामा ला जायला ट्रेन ची सोय होती. तसे म्हटले तर कियामाची ट्रेन दर दीड तासाने. म्हणजे आपल्या दादर हुन कर्जत ची ट्रेन😆. मग timetable बघून ठरवले कि ७ वाजताची ट्रेन पकडायची.  Red Fern स्टेशन वरून. पुढे २-२.५ तासाचा ट्रेन प्रवास. 

सकाळी ६:४५ ला Redfern स्टेशन वर पोचलो. रवी आणि फॅमिली भेटले. अगदी ७ च्या ठोक्याला ट्रेन आली. ट्रेन मध्ये चढलो तो डबा "Silent Coach" होता. म्हणजे इथे जास्त बोलायची सोय नाही. ज्यांना शांतपणे झोप काढून प्रवास करायचंय त्यांची छान सोय. मग लगेचच दुसऱ्या डब्यात गेलो. आमच्या गप्पा सुरु झाल्या. पुढे Waterfall स्टेशन जाताच मी खिडकीत बसलो. कारण आता खिडकीतून "Grand Pacific Road" दिसणार होता. हा रस्ता म्हणजे पॅसिफिक महासागराला समांतर highway. एका बाजूला ट्रेन , एका बाजूला अथांग महासागर आणि ह्या दोघांच्या मध्ये हा highway!



आज रविवारी कियामाच्या जवळ रेल्वेट्रॅकचे काम असल्यामुळे गाडी Woolongong पर्यंतच होती. तिथून पुढे कियामाला जायला बसची मोफत व्यवस्था. साधारण ९:३० पर्यंत कियामात पोचलो. हे एक छोटेसे town. समुद्रालगत. बरेचसे tourist. आधी नाश्त्याची सोय केली. पोटपूजा झाल्यानंतर beach च्या समांतर चालायला सुरुवात केली. इथे बीच म्हण्यापेक्षा cliffs आहेत. संदुरलगतचे कडे. पुढे असेच चालत चालत blowhole point जवळ आलो आणि बघतो तर काय, समुद्राच्या पाण्याची खरंच एकामागोमाग एक कारंजी उडत होती. 

कियामा blowhole 

समुद्राला भरतीची वेळ असल्याने आम्हाला भरपूर blowholes पाहायला मिळाले. कधीकधी ही कारंजी २०-२५ फूट हवेत उडायची. कधी कधी अगदीच ८-१० फूट. मध्येच त्यात इंद्रधनुष्य दिसायचे. एकूणच एक मस्त अनुभव होता. बर, इथे railing लावले असल्याने safety व्यवस्थित.

मग पुढे अजून चालत गेलो ते समुद्रात लांब गेलेल्या कड्याच्या टोकावर. इथून जो पॅसिफिक महासागराचा जो नजारा होता तो कॅमेऱ्यापलीकडचा!

मी आणि background मध्ये पॅसिफिक महासागर 
Kiama beach 

इथेच मग खूप फोटो काढले. थोड्यावेळाने परतीचा रस्ता सुरु केला. पुढे एका ठिकाणी, समुद्राच्या लगतच एक swimming pool होता. म्हणजे खडकांपासून बनलेला आणि लाटांच्या खाऱ्या पाण्याने भरलेला. सकाळचे ११:३० आणि ऊन असले तरी पाणी गोठवणारे होते. त्यात काही local माणसे आणि त्यांची लहान मुले सूर मारत पोहत होती!

पुढे एक फिश मार्केट दिसले. हे फिश मार्केट म्हणजे इथे बर्फात गोठवून ठेवलेलं ताजे मासे. मासे काय, इथे तर अगदी लॉबस्टर, खेकडे, इथपासून अगदी ऑक्टोपस सुद्धा विकायला होते. बाजूलाच छोटे विक्रीचे भरपूर स्टॉल्स होते. Souvenirs, दागिने, कपडे, खेळणी वगैरे. आपल्या जत्रेत असतात तसे. 

पुढे रस्ता क्रॉस करून लंच साठी चांगले रेस्टॉरंट शोधत होतो. एव्हढ्या समुद्रकाठी आलो तर "fish-n-chips"  खायला हवतेच. त्यात फिश म्हणजे इथे combo बॉक्स! अगदी फ्रेश मासे! २-३ प्रकारचे मासे, fried prawns, crab meat balls, calamari. आणि बरोबर भरपूर chips! पर्वणीच. 

Lunch नंतर Woolongong ला जायचे ठरवले. वुलोंगॉंग म्हणजे मोठे beach आणि lighthouse. बस येईस्तोवर दुपारचे २ वाजले होते. भरपेट जेवण आणि मग तासभर बस प्रवास म्हणजे दुपारची झोप झाली 😆. ३-३० पर्यंत Woolongong स्टेशन वर आलो. हा बसचा शेवटचा थांबा. इथून १५-२० मिनिटे चालत चालत बीच गाठले. 

Woolongong beach आणि  lighthouse 

मी, Woolongong beach वर 

Woolongong Lighthouse
मग बीच वरून चालत चालत त्या लांब दिसणाऱ्या lighthouse पाशी गेलो. काय मस्त view होता. ३ बाजूला अथांग समुद्र! मस्त वारा. थोड्यावेळात सूर्यास्ताची चाहूल लागली. हळूहळू आकाश सोनेरी व्हायला लागले. तेच काही क्षण कॅमऱ्यात बंदिस्त केले. एव्हाना आता परतीचा रस्ता पकडला. कारण सिडनीला जायची ट्रेन सुद्धा सकाळ सारखी दर दीड तासाने. ती चुकवायची नव्हती. परत सिडनी येईस्तोवर आणि हॉटेल गाठेपर्यंत रात्रीचे ८-८:३० वाजले.

To be continued...

Post a Comment

1 Comments