Harbor Bridge आणि Observatory
आज ८ जुलै. मागील ५ दिवसांत ह्या weekend चा plan करून झाला होता. आज Sydney Harbor Bridge च्या अगदी जवळ जाणार होतो. तसा हा bridge आधीच लांबून बघून झाला होता. पण तो प्रत्यक्षात अगदी जवळून कसा दिसतो ते बघायचे होते. नेहमी सारखेच Google Maps कामाला आले. आधीच कसे, कुठे जायचे हे बघून ठेवले. आसपास अजून काही बघण्यासारखे काय काय आहे हे सुद्धा बघून ठेवले होते. म्हणजे २-४ जागा options असलेल्या बऱ्या. म्हणजे आधीच २०-३० मिनटे फिरत फिरत इथं यायचे. आणि जागा आवडली नाही म्हणून तसाच गेलो असे व्हायला नको 😄.
Sydney Harbor Bridge हा north आणि south Sydney ला जोडतो. म्हणजेच इथे चांगले फोटो काढायचे असतील तर अगदी सकाळी यायचे, जेणेकरून सूर्यप्रकाश directly ह्या bridge वर येईल, किंवा संध्याकाळी. आता इतक्या सकाळी लवकर उठून कोण येणार इथे. म्हणून मी संध्याकाळची वेळ ठरवली. Photography मध्ये खरचं interest असेल तर ह्या गोष्टी समजून planning करावं लागत. पण हे काही फोटोमध्ये दिसत नाही. फोटोमध्ये फक्त कलाकृती दिसते. असो.
आता हिवाळा म्हणजे सूर्यास्त लवकर होतो इथे. म्हणजे ५-५३० पर्यंत. मग ठरवले कि ४-४३० पर्यंत bridge च्या इथे photography करायची. मग ५-५३० पर्यंत Sydney Observatory ला भेट द्यायची आणि ७ पर्यंत परत यायचे. lunch आटपून थोडा झोपलो आणि फ्रेश होऊन साधारण पावणे चार ला हॉटेल मधून निघालो. हॉटेल वरून सरळ चालत जात Pitt street गाठले. इथे आधी येऊन गेल्यामुळे साधारण आता रस्ता ओळखीचा होता. पुढे अजून १०-१५ मिनिटं चालत गेल्यावर Circular Quay आले. तसं म्हटलं तर हॉटेल पासून ५ मिनिटांवर मेट्रो स्टेशन होते. तिथून ट्रेन पकडून आलो असतो. पण चालत फिरण्यात एक वेगळीच मजा.
Circular Quay ला पोहोचताच मोठ्या cruise ship चे दर्शन झाले. बाजूलाच काही street artist डान्स करत होते. Group डान्स. मध्येच इतर बघे त्यात भाग घेत होते. एक प्रकारचा dance workshop वाटला.
इथून पुढे निघालो. अजून Harbor Bridge च्या जवळ जायला १०-१५ मिनिटं गेली. आलो एकदाचा. Dawes Point जे जागेचं नाव. डाव्या बाजूला अजस्त्र, महाकाय Harbor Bridge आणि उजव्या बाजूला थोडे लांब Opera House. आणि आजू-बाजूला paved road आणि एक छोटीशी गार्डन. पश्चिमेकडून sunlight मस्त येत होता. हेच बघायला आणि असाच हवा असलेला फोटो काढायला आलो होतो इथे.
Harbor Bridge and view of North Sydney |
Sydney Harbor Bridge |
अजून थोडी फोटोग्राफी केली. तिथेच एका बाकावर बसलो. समोरच काही तरुण fishing करत होते. गळ टाकून बसले होते. काही लोकं evening walk साठी इथे आले होते. एका couple चे photoshoot चालू होते. Pre -wedding असावे कदाचित 😄.
थोड्यावेळाने मग त्या छोट्या गार्डनला वळसा घालून bridge च्या exactly खालील बाजूस आलो. Pylon Lookout आणि Dawes Point Battery. इथून पाहतो तर काय! वर मोठा bridge... त्याचे ते धातूंचे मोठमोठे pillars आणि girders. त्यावरून ट्रेन आणि वाहनांची रहदारी सुरु. Civil Engineering आणि architecture ची एक किमयाच! बघूनच मन थक्क होते.
Sydney Bridge च्या खाली |
एव्हाना हळूहळू सूर्यास्ताची चाहूल लागली होती. मगाशी पाहिलेलं cruise ship आता भोंगा वाजवून निघायची तयारी करत होते.
Cruise at Circular Quay |
म्हटलं आता इथून निघायला हवे. पुढे वाटेत असंच बघू Sydney Observatory काय आहे ते. ५-१० मिनिटं पायपीट करत एक roundabout लागले. म्हणजे रस्त्यात चौकापाशी उभारलेला एक गोल. इथे एका गाडीवर भाला मोठा दगड पडल्यासारखा होता. एक art ! 😐
Still Life with Stone and Car |
इथून पुढे एका चर्च पाशी आलो. वाटेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला row houses होती. एकूणच बघून हा जरा उच्च्भ्रू भाग वाटला. आणि लोकांची वर्दळ पाहता हि एक retirement कॉलनी वाटली. चर्चच्या पुढे रस्ता क्रॉस करताच "Sydney Observatory" ची पाटी दिसली.
आत शिरताच पुढे पाच एक पावलांवर एक छोटी टेकडी होती. इथे एक गोलाकार जागा. तिथे जातच समोर नजर टाकली आणि समोरचा view बघून स्तब्ध झालो.
View from Sydney Observatory |
North Sydney चे lights, Harbor Bridge, मावळतीचा सूर्य, निळे,सोनेरी,गुलाबी रंगांची उधळण झालेलं आकाश, मधेच वाऱ्याची थंड झुळूक! हा क्षण कॅमेराच्या पलीकडचा होता. बाजूलाच काही families बसल्या होत्या. सगळे जण समोरचं दृश्य कॅमेऱ्यात टिपत होते. प्रयत्न करत होते 😅
|
Sydney Harbor Bridge आणि मी |
मग इथेपण स्वतःचे फोटो काढून घेतले 😊. सूर्यास्त होई पर्यंत इथेच बसून होतो. Observatory ला भेट देणं असा view मिळणं जरा unexpected होतं. कारण म्हणजे जितके articles आणि posts चाळले त्यात ह्या जागेच विशिष्ट असा उल्लेख नव्हता. बरं FB आणि Insta वर पण एव्हढे फोटो नाहीत ह्या जागेचे. पण मजा आली. एकूणच मला हि जागा खूपच आवडली. A hidden gem! आजची संध्याकाळ नक्कीच "One of the most memorable evening" होती.
इथून निघालो. उद्या monday म्हणजे office! ह्या वेळी पुढील weekend चा प्लॅन मित्राने आधीच केला होता. Kiama Beach.
To be continued...
2 Comments
छानच लिहिले आहेस .फोटो पण सुरेख.
ReplyDeleteMast. Maja Aali vachun.
ReplyDelete