Sydney Diaries भाग 9 : Taronga Zoo आणि सिडनीतील India
१९ ऑगस्ट. आज Taronga Zoo चा प्लॅन आखला होता. या आधी डार्लिंग हार्बर मधले Sydney Wildlife Zoo बघून झाले होते. पण ते एक छोटेसे tourist attraction होते. हे Taronga Zoo म्हणजे मुख्य शहराच्या थोड्या बाजूला. इथे जायचे म्हणजे Circular Quay वरून फेरी पकडायची आणि Taronga Zoo च्या स्टॉपला उतरायचे. परत येण्यासाठी सुद्धा हाच मार्ग. ट्रेन किंवा रस्त्याने जायचे म्हणजे थोडा त्रासच. कारण direct ट्रेन नाहीच. बरं, पुढे बस चे timings पण जुळणारे नव्हते. मग ठरवलं की Circular Quay ने फेरीनेच जायचं.
तरोंगा झू चा प्लॅन ठरवायच्या आधी मी Jenolan Caves चा प्लॅन आखत होतो. पण तिथे travelling options खूपच limited होते. आणि परत hotel वर यायला रात्र होण्याचे chances जास्त होते. मग तो प्लॅन रद्द करून ह्या zoo ला जायचे नक्की केले. Taronga Zoo च्या official website वरून आधीच तिकीट काढले. इथे सिडनी मध्ये एक चांगलं होतं की almost सगळ्याठिकाणी, जिथे entry fee आहे, तिथे online tickets काढता येतात. म्हणजे entry करताना भल्यामोठ्या रांगेत उभी राहायची गरज नाही 😀.
तर मग रविवारी ७-७३० ला सकाळी हॉटेल वरून निघालो. आधी breakfast करून घेतला. मग तिथून Town Hall स्टेशन गाठले. इथून मग मेट्रोने Circular Quay ला आलो. इथे फेरी चे ६-७ थांबे आहेत. सिडनी मधलं सगळ्यात महत्वाचं जलमार्गाचं स्टेशन. इथून Taronga, Manly, Darling Harbor, Watson Bay, Paramatta आणि बऱ्याच ठिकाणी फेरीनं जाता येतं. आज रविवार असल्यामुळे मेट्रो, बस आणि फेरी, कसाही प्रवास केला तरी फक्त २.७० AUD तिकीट! थोड्यावेळातच फेरी निघाली. २ मिनिटांतच Opera House दिसले. ह्या वेळी बाजूने. मग काय, फोटोग्राफी सुरु. Circular Quay ते Taronga Zoo म्हणजे साधारण ३०-४० मिनिटांचा प्रवास. ९:१५ च्या आसपास Taronga Zoo ला आलो.
Sydney Opera House |
सुरुवातच बाजूच्या rain forest ने केली. इथे भरपूर प्रकारचे पक्षी. सोबत DSLR Camera आणि हवी असलेली lens होतीच. मग काय? माझ्यातला bird फोटोग्राफर जागा झाला. 😀
Birds at Taronga Zoo |
Komodo Dragon |
मग माझा मोर्चा मी हत्तींच्या कळपाकडे वळवला. आता त्यांची आंघोळीची वेळ होती. म्हणजे १२ च्या आसपास. आज ह्यांचा पण sunday funday असावा 😂 एक मोठा हत्ती आणि पिल्लू एका छोट्या डबक्यात मस्तपैकी डुंबत होते. बाजूलाच अजून २-३ मोठे हत्ती होते. मध्येच काय तो सोंड वर करतोय, कान हलवतोय, सोंडेनं माती हवेत उडवतोय. मजा चालू होती.
मग म्हटले आता जिराफ आहे तिथे जाऊन बघू काय आहे. तर वाटेत जाताना एका बाजूला meerkat चा कळप होता. meerkat म्हणजे मुंगूस प्रकारातला एक प्राणी. भयंकर चळवळ्या. मधेच एका जागी उभे राहून, मान वर करून इकडे तिकडे बघणार, परत मग पळापळ सुरु. तर असा हा प्राणी या आधी discovery वा animal planet सारख्या वाहिनी वर पाहिलेला.
Meerkat |
ह्यांचे फोटो काढून होताच मी जिराफांकडे वळलो. इथे ह्यांचा लंच चालू होता. एक बाई कर्मचारी त्यांना मोठ्या बादलीतून भरपूर गवत भरवत होती. अर्थात ती एका उंच फळीवर उभी होती आणि हे जिराफ १२-१५ फूट उंच. जिराफांचे फोटो काढून मग मी सुद्धा लंच केला. लंच नंतर साधारण १:३०-२ वाजता सील शो होता. मग तिथे वळलो. इथे मात्र बऱ्यापैकी रांग होती. मी जाईपर्यंत almost house-full झाले होते. मग जरा इथे तिथे शोधून त्यातल्यात्यात चांगली जागा निवडली. म्हणजे जरा चांगले फोटो काढता येतील. हा सील शो म्हणजे ४-५ सील आणि त्यांच्या करामती. Injured किंवा stray सील इथे आणले जातात. काही काही तर अगदीच २-३ महिन्यांचे असतात. मग त्यांच्यावर उपचार करून त्यांना इथेच वाढवले जाते.
Seal Show |
ह्या aquarium मध्ये खरे सांगायचे तर एवढी मजा नव्हती. Sydney SEALIFE aquarium मधेच जास्त मजा होती. तरी नाही म्हटले तरी इथे सुद्धा बऱ्यापैकी मासे आणि इतर जलचर होतेच. मगाशी पाहिलेले सील इथे मत्सालयात जाम मजा करत होते. इथून पुढे निघालो ते zoo च्या exit पाशी जायला. वाटेत जात जात एक स्पॉट दिसला. इथून सिडनी CBD चा परिसर आणि हार्बर ब्रीज असे मस्त दृश्य होते. हे दृश्य सिडनीच्या आसपास बऱ्याच ठिकाणाहून दिसते. पण प्रत्येकाचा अँगल वेगळा 😄
Sydney CBD and Harbor Bridge seed from Taronga Zoo |
Harbor Bridge |
--------
माझा मित्र अविनाश ह्याचे ऑफिस माझ्या ऑफिसच्या अगदी बाजूलाच. आम्ही लंच साठी बऱ्याच वेळा एकत्र जायचो. गप्पा गप्पांत तो असंच म्हणाला होता की पॅरामॅट्टाला ला एक इंडियन चाट च हॉटेल आहे. Chatkaz म्हणून. जाऊ एकदा तिथे. पण हा प्लॅन काही होत नव्हता. मग असाच शनिवारी त्याचा फोन आला आणि म्हणाला चाल जाऊया रविवारी. मी पण एका पायावर तयार.
Paramatta माझ्या हॉटेल पासून अर्ध्या तासावर. ट्रेन ने. Paramatta म्हणजे सिडनीमधील भारतच. most of Indians हे इथेच राहतात. इंडियन स्टोअर्स सुद्धा इथे जास्त. एक South Indian देऊळ सुद्धा आहे इथे. जसं माझ्या हॉटेल पासून ५ मिनिटांवर चिनी लोकांचे China Town, तसेच भारतीयांचे Paramatta. मग ठरल्या प्रमाणे मी Townhall स्टेशन वरून Central ला आलो. Central म्हणजे आपल्या CST सारखे स्टेशन. इथे ४-५ मेट्रो लाईन्स एकत्र येतात. आणि सिडनीच्या मध्यभागी आहे हे. म्हणून नाव सेंट्रल. मग इथेच अविनाश भेटला. मग इथूनच आम्ही Paramatta साठी ट्रेन पकडली. ११-११:१५ पर्यंत पोहचलो. मग ठरवलं आधी इथे जवळच असलेलं मुरुगन temple बघून येऊ. Paramatta मध्ये भारतीय लोकं जास्त असले तरी त्यात सुद्धा दाक्षिणात्य जास्त. मग साहजिकच त्यांचे देऊळ आले. स्टेशनच्या बाहेरच असलेल्या स्टॉप वरून बस पकडून ह्या देवळापाशी आलो. रस्ता cross करून आम्ही जातोय तोच समोरून एक पन्नाशीतले गृहस्थ समोर आले आणि चक्क हिंदी मधून त्यांनी आम्हाला एक पत्ता विचारला. आधी २ सेकंद आम्ही गांगरलोच. सिडनी मध्ये अश्या कोण्या अनोळखी व्यक्तीकडून हिंदी ऐकणे अजिबातच अपेक्षित नव्हते. 😆. बरं हे सगळं होताच समोरच असलेल्या देवळात आलो.
मुरुगन देऊळ, पॅरामॅटा |
चट्काझ मध्ये बऱ्यापैकी गर्दी. म्हणजे नॉन इंडियन लोकं सुद्धा. १०-१५ मिनिटं waiting मध्येच उभे होतो. ऑस्ट्रेलियन लोकं छोले भटुरे, नान, डोसा वगैरे चक्क हाताने खात होते. चमच्याने नाही. नशीब 😅. मग आम्ही सुद्धा ऑर्डर रेडी ठेवली. वडापाव आणि दहीपुरी. अहाहा! नुसता मेनू बघूनच मन तृप्त झाले!इटालियन,थाय, चायनीज कितीही खा. आपले भारतीय खाणे म्हणजे एक वेगळीच गोष्ट. आणि त्यात वडापाव म्हणजे जीव कि प्राण! मग स्वीट्स मध्ये बघत होतो जिलेबी आहे का ते. पण जरा निराशाच झाली.
सिडनीतला वडापाव |
बन मधला वडा, त्या बरोबर गोड, तिखट, सुखी चटणी आणि मिरची. क्या बात. भाई आज मजा आ गया 😋. हे फस्त करून मग परत हॅरिस पार्क स्टेशन वर आलो ते Auburn ला जायला. तिकडची प्रसिद्ध Student बिर्याणी खायला....
To be continued....
0 Comments