Blue Mountains
सिडनीमधील beaches, tourists attractions, gardens, Opera House वगैरे गोष्टी बघून झाल्या होत्या. आता वेळ होती ऑस्ट्रेलियाच्या डोंगररांगा बघायची. Mountains are calling and I must go... तसेच काहीसे. गेल्या ५-६ वर्षात सह्याद्री आणि हिमालय फिरल्यामुळे आता तसे डोंगरांचे नाविन्य नव्हते, तरीपण एखाद्या वेगळ्या खंडातील डोंगररांगा बघण्यात थोडी वेगळी excitement. मग ठरवले कि ExperianceOz वर अशीच एक टूर बुक करायची आणि Blue Mountains बघून यायचे.
Blue Mountains म्हणजे सिडनी पासून साधारण २-२.५ तासाचा प्रवास. अशीच एक टूर पाहिली आणि लगेच बुक करून टाकली. ह्या टूर मध्ये माझ्या हॉटेल पासून २ पावलांवर बसचा pickup point होता. तिथून एक छोटी बस आम्हाला mountains च्या पायथ्याशी घेऊन जाणार होती. Guide सुद्धा आमच्याच बरोबर. Blue Mountains मध्ये भटकंती झाली की हीच बस आम्हाला सिडनी ऑलिम्पिक पार्कच्या इथे नेऊन सोडणार आणि मग फेरीने सिडनी CBD ला परत नेणार. या आधी सिडनीमध्ये पायी किंवा मेट्रोने थोडा फिरलो होतो. सिडनीच्या बाहेर roadtrip अशी झाली नव्हती आणि येताना छोट्या cruise मधून येणार म्हणून अजून थोडी मजा.
रविवार ५ ऑगस्ट. सकाळी ८:१५ चा pickup time होता. माझ्या हॉटेलच्या पुढे २ पावलांवर. मी ८ वाजताच तिथे हजर. रविवार म्हणून आज रस्त्यावर तशी जास्त वर्दळ नव्हती. थंडी बऱ्यापैकी होती. बरोबर एक extra jacket घेतले होते. Office मध्ये मी blue mountains ला जाणार सांगताच सगळ्यांनी हेच सांगतले. तिथे खूप थंडी असते, extra jacket वगैरे मस्ट आहे वगैरे. Tour वाल्यांकडून SMS आला होता. बस नंबर आणि इतर माहिती दिली होती. मी बसची वाट पाहत होतो. अगदी ८:१५ च्या ठोक्याला एक तिशीतला माणूस माझ्याकडे चालून आला. आयडेंटिटी confirm केल्यावर म्हणाला बस सिग्नलला थांबवली आहे, चल जाऊया. ह्याचे नाव Jeson. हाच आजचा ड्राइवर आणि गाईड होता. बस मध्ये शिरताच पहिले अर्धी बस भरलेलीहोती. तरीपण एक खिडकी रिकामी दिसली. मग लगेच ती पकडून बसलो. बरोबर वेगवेगळ्या देशातले टुरिस्ट होते. काही भारतीय, काही Indonesian, Dutch, German, British वगैरे.
सिडनी शहरात अजून काही जणांना pickup करून आता आम्ही Blue Mountains च्या दिशेनं मार्गस्थ झालो. प्रवास २-२:५ तासांचा होता. वाटेत Jeson आजची itinerary समजावत होता. आपण किती वाजता कुठे पोहोचणार, कुठे काय-काय बघायचे, ब्रेकफास्ट आणि लंच साठी कुठे थांबायचे आणि बरेच काही. मधेच blue mountains आणि aboriginal, म्हणजे ऑस्ट्रेलियातील मूळचे लोकं, त्यांच्याबद्दल सांगितले. मधेच आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत, आमचा प्रवास चालू होता. ब्रेकफास्ट साठी वाटेतच छोटा थांबा घेतला आणि परत प्रवास सुरु झाला.
साधारण १०:३०-११ पर्यंत आम्ही blue mountains ला पोचलो. इथे आम्हाला फिरायला एकूण दीड तास मिळणार होता. त्यानंतर आम्ही लंचला निघणार होतो. पहिला stop होता तो cable car चा. म्हणजे एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठीची cable car.
Cable car मधून दुसऱ्या डोंगरावर बाहेर पडतोय तोच पुढे एक छोटी train. हि जगातील सगळ्यात जास्त चढावाची ट्रेन. world's steepest train. तर हि छोटी train म्हणजे पूर्वी इथे कोळश्याच्या खाणीत वापरात असायची. ह्या खाणी बंद झाल्यावर त्याचा उपयोग आता tourist spot म्हणून. ह्या छोट्या train मधून आपण आधी ह्या mountains च्या आत खोल भागात जातो. गर्द झाडी, जुन्या खाणी, त्यांचे अवशेष, जुनी घरे/केबिन्स , वगैरे जतन करून ठेवलेला भाग. ह्या भागाचे नाव rain forest. म्हणजे आपल्या सह्याद्री सारखी गर्द झाडी, घनदाट जंगले! ह्या rain forest मधून फिरायला एक छानसा लाकडाचा trail तयार केलेला आहे. जरी जागोजागी दिशादर्शक असले तरी एकूणच हि वाट चकवा देऊ शकते😅
जुन्या, बंद झालेल्या खाणी |
Blue Mountains म्हणजे aboriginal लोकांची वस्ती. म्हणजे पाश्चत्य लोकांच्या वसाहतींच्या आधी इथे स्थायिक मूळचे लोक. हा परिसर Katoomba या नावाने ओळखला जातो. इथेच एक जवळ ३ सुळक्यांचा समूह आहे. त्याला "३ sisters" म्हणतात. आमच्या गाईडच्या म्हणण्यानुसार हे ३ डोंगर म्हणजे ३ बहिणी आहेत ज्या त्यांच्या वडिलांची वाट पाहत उभ्या आहेत. त्यांचे वडील जवळच्याच जंगलात शिकारीसाठी गेलेत, वगैरे. पुढे गाइडेनेच सांगतिले की अश्या अजून ४-५ दंत कथा आहेत ह्या सुळक्यांबद्दल. म्हणजे जगात कुठेही जा, कुठचेही culture बघा, काहीनाकाही तरी अश्या कथा असतातच ज्याला काही base नसतो. अश्याच त्या पिढ्यानपिढ्या ऐकिवात येतात. 😄
एव्हाना १२:३० वाजले होते. सगळे १-१ करत बसमध्ये परत आले. आता पुढचा थांबा होता लंच साठी. लुरा (Leura) टाउन मध्ये. इकडची छोटी टाऊन्स पण मस्त. १-२ मोट्ठे रस्ते, २-३ चौक, २-३ मोठे शॉपिंग स्टोअर्स, १ महत्वाचा रस्ता जिथे हॉटेल्स आणि टुरिस्ट साठी उपयोगाची दुकाने. सगळे काही organised आणि disciplined. जेवण झाल्यावर मोर्चा वळवला तो Wenworth falls आणि Lincon's rock कडे.
एकूणच सह्याद्री आणि आपल्या पश्चिम घाटातले धबधबे पाहिल्यानंतर ह्या Wenworth falls मध्ये मला काही मजा वाटली नाही. हा धबधबा म्हणजे जंगलात २००-२५० पायऱ्या उतरून जावं लागतं. तसं ok -ok होतं. पुढे आम्ही निघालो ते Lincon's Rock कडे. परतीच्या आधीचा शेवटचा स्टॉप. हा भाग म्हणजे आपल्या पांचगणीच्या table point सारखा. सरळ सपाट मोठा डोंगर. इथून जिथे नजर टाकाल तिथे दूर पसरलेले blue mountains परिसर आणि घनदाट जंगलं. Lincoln Hall ह्या गिर्यारोहकाच्या स्मरणार्थ हे नाव.
३:३०-३:४५ च्या आसपास आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. ह्या वेळी बस आम्हाला सिडनीमध्ये न सोडता ऑलिम्पिक पार्क जवळ फेरीच्या धक्क्याला सोडणार होती. म्हटलं तरी अजून तासभर प्रवास होताच. Jeson ने मग सांगतिले कि जाताजाता आपण ऑलिम्पिक पार्कला भेट देऊन जाऊ. भेट म्हणजे बस मधूनच.
हे पार्क म्हणजे २००० सालच्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन सिडनी मध्ये होते त्यासाठी बांधलेले. आता ऑलिम्पिक म्हटले की जवळपास सगळ्याच प्रकारचे खेळ आणि त्यासाठीची तयारी आली. ऑलिपिंक नंतर ह्या स्टेडियम आणि पार्क चा उपयोग आता मोठ्या events आणि concerts साठी केला जातो.
इथून पुढेच ऑलंपिक पार्क wharf होता. म्हणजे जलमार्गाचा थांबा. हा परतीचा प्रवास नक्कीच exciting होता. Paramatta नदीतून आमची छोटी cruise शहराकडे वाटचाल करत होती. त्यात ह्या बोटीच्या open deck वरून सूर्यास्त बघणे म्हणजे पर्वणीच!
पण थोड्याच वेळात जो नजारा दिसला तो म्हणजे वर्णनापलीकडे! आधी लांबून दिसणारा सिडनीचा Harbor Bridge जसजसा जवळ येतोय तशी deck वरची गर्दी वाढत गेली. प्रत्येक जण perfect spot घेऊन उभा होता. मग बोट चक्क bridge च्या अगदी खालून पुढे गेली. आणि पुढे रात्रीच्या झगमटाटात न्हाहून निघालेलं Opera House! म्हणजे cherry on top !
3 Sisters at Blue Mountains |
एकूणच सह्याद्री आणि आपल्या पश्चिम घाटातले धबधबे पाहिल्यानंतर ह्या Wenworth falls मध्ये मला काही मजा वाटली नाही. हा धबधबा म्हणजे जंगलात २००-२५० पायऱ्या उतरून जावं लागतं. तसं ok -ok होतं. पुढे आम्ही निघालो ते Lincon's Rock कडे. परतीच्या आधीचा शेवटचा स्टॉप. हा भाग म्हणजे आपल्या पांचगणीच्या table point सारखा. सरळ सपाट मोठा डोंगर. इथून जिथे नजर टाकाल तिथे दूर पसरलेले blue mountains परिसर आणि घनदाट जंगलं. Lincoln Hall ह्या गिर्यारोहकाच्या स्मरणार्थ हे नाव.
Lincoln's Rock, Blue Mountains |
हे पार्क म्हणजे २००० सालच्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन सिडनी मध्ये होते त्यासाठी बांधलेले. आता ऑलिम्पिक म्हटले की जवळपास सगळ्याच प्रकारचे खेळ आणि त्यासाठीची तयारी आली. ऑलिपिंक नंतर ह्या स्टेडियम आणि पार्क चा उपयोग आता मोठ्या events आणि concerts साठी केला जातो.
Crossing Paramatta bridge |
The Opera House at night |
मग आमची बोट circular quay ला थांबली आणि मी मेट्रोने माझ्या हॉटेल च्या दिशेनं रवाना झालो. आज एकूणच धमाल आली. Roadtrip, Mountains, Sunset, Cruise आणि मुख्य म्हणजे चांगले फोटो 😎
To be continued...
0 Comments