Sydney Diaries भाग 8 : Darling Harbor आणि Watson bay

Darling Harbor आणि  Watson bay

गेले २-३ आठवडे टिपिकल tourist spots पाहिले होते. काही मित्रांबरोबर आणि काही टूर बुक करून. मग ठरवले कि ह्या वीकएंडला स्वतःच काहीतरी explore करू. एक option होता तो Darling Harbor चा. पण डार्लिंग हार्बर म्हणजेएकच संध्याकाळ जाईल. म्हणून मग google map वर सिडनीच्या आसपास काही दिसतंय का ते बघत होतो. Maps manually explore करणं हे पण एक skill आहे 😉. साधारण समुद्राच्या जवळ, काही green patches, काही फोटो स्पॉट्स दिसतात का ते शोधायचे. मग त्याचा street view बघायचा, वाटल्यास satellite view सुद्धा बघायचा. म्हणजे आपल्याला तिथे जायच्या आधीच थोडी कल्पना येते. हे फोटोग्राफी साठी नक्कीच उपयोगी. म्हणजे इथे natural light कसा आणि कधी मिळेल, फोटो कसे येतील, चांगला view कोणत्या वेळी मिळेल हे ठरवता येते. 

मग ठरलं. शनिवारची संध्याकाळ डार्लिंग हार्बरला आणि रविवारची Watson Bay आणि Hornby Lighthouse ला. डार्लिंग हार्बर म्हणजे Sydney CBD च्या अगदी बाजूलाच. तसा हा भाग तर माझ्या हॉटेल रूमच्या खिडकीतून सुद्धा दिसायचा. वीकएंडला इथे एक जत्रेसारखा feel असतो. बऱ्यापैकी गर्दी, giant wheels, lighting वगैरे. साधारण सूर्यास्तानंतर हा भाग झळाळून उठतो. शनिवारी दिवसभर आराम केला आणि ६:३०-७ ला संध्यकाळी निघालो. 

माझ्या हॉटेल पासून इथे यायला तरी दहा एक मिनिटं लागतात. Druitt Street वरून थोड्या पायऱ्या चढून आपण डार्लिंग हार्बरला पोहोचतो. इथे आल्यावर एक वेगळ्याच विश्वात आल्याचा भास झाला. वातावरणतच एक वेगळा उत्साह होता. इथे फिरायला पण भरपूर. हा भाग म्हणजे Cookle Bay च्या सभोवती भराव टाकून recreational area बनवलेला. म्हणजे साधारण इंग्रजीतील C आकार. मध्यभागी उपसागर आणि ३ बाजूला फिरायला भरपूर जागा. आपल्या मुंबईच्या marine drive सारखे. बरं इथे ह्याच्याच समोर Pyrmont Bridge. म्हणजे C आकाराला वळसा घालायचा नसेल तर सरळ हा ब्रिज क्रॉस करायचा😄. 

ठरवले, की हा C आकार फिरून मग ब्रिज क्रॉस करू. म्हणजे round-trip होईल. मग आधी ह्या C shape मध्ये चालायला सुरुवात केली. एका बाजूला सिडनी CBD ची मस्त skyline तर दुसरीकडे डार्लिंग हार्बरची मोठाली हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार. Sydney CBD म्हणजे बऱ्याच मोठ्या कंपन्यांची offices, मोठी हॉटेल्स, commercial buildings आणि बरच काही. त्यात रात्रीचं lighting. आणि ह्या देखाव्याचं समोरच्या उपसागरात दिसणारं प्रतिबिंब! क्या बात!

Sydney CBD from Darling harbor
 पुढे चालत गेल्यावर परत थोड्या पायऱ्या चढून ह्या Pyrmont Bridge वर आलो. हा ब्रिज तसा नक्कीच जुना आहे. १८५८ मधला. नंतर खूप वेळा डागडुजी झाली. दुपारच्या वेळेत हा ब्रीज बोटींना ये-जा करायला खुला असतो. म्हणजे जगप्रसिद्ध लंडन ब्रीज सारखा.

Pyrmont Bridge
ह्या Pyrmont ब्रिज वरून सिडनी CBD च्या दिशेनं चालत गेलो. एका बाजूला डार्लिंग हार्बर तर दुसऱ्या बाजूला Cookle Bay. डार्लिंग हार्बरचं उजळून टाकणारं दृश्य आणि त्याचं प्रतिबिंब! परत एक photogenic view !

Darling Harbor from Pyrmont Bridge
Pyrmont Bridge उतरून परत CBD मध्ये आलो. आता dinner ची वेळ. आज एकूणच खूप मस्त फोटो मिळाले. जास्त फिरलो नाही, पण जेव्हढं फिरलो त्यात नक्कीच मजा आली. आता पुढचा स्टॉप Watson Bay. 

------------------------

आज रविवार, १२ ऑगस्ट. आज सिडनी मध्ये सकाळी City 2 Surf हि मॅरेथॉन होती. म्हणजे सिडनी शहरातून सुरु होणारी हि शर्यत बोन्डाय बीच वर संपणार होती. त्याच्याच आयोजनार्थ आज सकाळी काही रस्ते आणि वाहतुकीचे मार्ग बंद होते आणि काही वळवले होते. हे आधीच माहित असल्याने, मी Watson Bay ला संध्याकाळी जाणार होतो. Watson Bay साठी तशी डायरेक्ट मेट्रो लाईन नाही. मेट्रो ने Edgecliff स्टेशन गाठायचं आणि मग बसने प्रवास, किंवा मग Town Hall बस स्टॉप वरून डायरेक्ट बस. बरं, तर हि डायरेक्ट बस सुद्धा दर २०-२५ मिनिटांनी. मग वेळेचं गणित आखून ३:३० ची बस पकडायची असे ठरवले. Watson Bay ला पोचायला ३०-४५ मिनिटं. तिथून Hornby Lighthouse चा trail म्हणजे अजून २०-२५ मिनिटं. म्हणजे साधारण लाईटहाऊस ला ४:३०-५ पर्यंत जायचे आणि ५:४५-६ पर्यंत परतीचा प्रवास सुरु करायचा असा बेत आखला. 


इथे बस, ट्रेन, बोट सगळे वेळेत. ३:३० ला बरोब्बर बस आली. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बसमध्ये सुद्धा मी google maps चालू ठेवतो. म्हणजे एकूण प्रवासात आपण कुठून कुठून फिरलो, बसचा मार्ग कसा होता, आपण कुठच्या भागात होतो ह्याची जाणीव होते. Curiosity म्हणा किंवा Alertness. आता ही सवयच झालीये. बसचा प्रवास पण छान होता. Town Hall, Kings Cross, Double Bay, Point Piper, Rose Bay असं एक एक करत Watson bay च्या दिशेनं जात होतो. मधेच एका बाजूला एकदा bay असायचा, त्यात भरपूर बोटी, yatches वगैरे. 

Watson Bay हा ह्या बसचा शेवटचा थांबा. थांब्या समोरचं Robertson Park. एक observe केलं होतं. सिडनी मध्ये parks आणि gardens अगदी कोपऱ्याकोपऱ्यावर. Open Space पण भरपूर.  ह्या पार्क च्या टोकाला Watson Bay Wharf आणि Marine Parade Beach. सिडनी मध्ये बीच मोजायचे नाहीत. १०० च्या वर beaches आहेत इथे! 😄 ह्या बीच वरून सिडनी CBD , Tower Eye, Harbor Bridge चा view मस्त दिसतो. पुढे ह्या किनाऱ्याच्या वाटेनं पुढे चालत गेलो. ५-१० मिनिटांवर परत पायऱ्या चढून एका उंचवट्यावर आलो. पुढे Hornby Lighthouse च्या दिशेची पाटी होतीच. हा रस्ता मग परत एका दुसऱ्या बीच वर नेतो. Camp Cove बीच. 

Another day, another beach in Sydney
ह्या बीच वरून मग एक अगदीच छोटी पायवाट निघते. थोड्या झाडीतून रस्ता काढत पायऱ्या सुरु होतात. दोन्ही बाजूला गर्द झाडी, आणि आपण ह्या छोट्या trail वर चालत राहायचे. मधेच थोडी मोकळीक येते, परत झाडी. असा ५-१० मिनिटं चालू होतं. त्याच्या पुढे गेल्यावर थोडा खडकाळ भाग आला. पुढे एक छोटे घर दिसले. Hornby Keeper's Cottage. 

Hornby Keeper's Cottage
ह्या cottage ला वळसा घालताच एकदाचे लाईटहाऊस दिसले. एकूणच हा Watson bay म्हणजे समुद्रात असलेलं जमिनीचं टोक. म्हणजे ह्याच्या ३ बाजूला, २७० अंशांत समुद्र! समुद्राच्या पलीकडे Manly चा भाग सोडला तर बाकी नजर टाकू तिथे फक्त निळं पाणी.

Hornby Lighthouse
इथेच मग थोडा वेळ घालवला. फोटो काढले. मग १०-१५ मिनिटांनी दुसऱ्या वाटेनं परतीचा प्रवास सुरु केला. हा दुसरा रस्ता म्हणजे आपण Watson Bay ला साधारण उलट्या U shape मध्ये फिरून येतो. पुढे हा रस्ता परत त्या झाडीत जोडला जातो. मग परत बीच वर आणि मग Robertson Park च्या दारात. एव्हाना ५:१५-५:२० होत होते. समोरच थोड्या पायऱ्या दिसत होत्या आणि त्याच्या वर काही लोकं दिसत होते. म्हटलं हा पॉईंट पण बघून घेऊ. असून असून काय असणार? अजून थोडा समुद्र 😂. नंतर regret नको व्हायला. रस्ता क्रॉस करून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. बऱ्यापैकी पायऱ्या आणि उंची होती. ४-५ मिनिटांनी टॉप वर आलो. इथे रेलिंग वगैरे safety होती. कारण खाली सरळ ड्रॉप. आणि जोरदार आदळणाऱ्या लाटा.

पहिल्या पॉईंट वरून काही खास view नव्हता. अजून पुढे चढून गेलो. ह्या पॉईंट चे नाव "Gap Lookout". समोर इथे पण अथांग समुद्र. पण बाजूलाच नजर टाकली आणि थक्क झालो. संपूर्ण Watson Bay इथून दिसत होता! आपण किती उंचावर आहोत ह्याचा अंदाज आला. एकूणच हा भाग म्हणजे एक छोटा डोंगरच! एका बाजूला beaches आणि दुसऱ्या बाजूला cliffs!

Watson Bay from Gap Lookout
इथे मनासारखे फोटो काढून घेतले आणि मग परत त्या पायऱ्या उतरून बस स्टॉप च्या दिशेनं रवाना झालो. परतीच्या प्रवासाला. आज स्वतः एकट्यानं offbeat place शोधून फिरल्याने जाम भारी वाटलं 😎. त्याच त्याच tourist place आणि गर्दीपासून जरा वंचीत अश्या काही जागा नक्कीच माझ्या top of list वर असतात.

To be continued...

Post a Comment

0 Comments