Sydney Diaries भाग 10 : Roadtrip, Cooma and Snowy Mountains

Roadtrip, Cooma and Snowy Mountains

१ सप्टेंबर, शनिवार. माझा सिडनी आणि ऑस्ट्रियामधला शेवटचा वीकएंड. ८ सप्टेंबरला मायदेशी निघणार होतो. ह्या वीकएंडला ऑफिसच्या मित्रांबरोबर road trip चा प्लॅन होता. Snowy Mountains चा. सिडनीपासून snowy mountains म्हणजे ५०० km च्या थोडे जास्त अंतर . म्हणजे ६-७ तासांचा प्रवास आलाच. त्यात हा रस्ता म्हणजे एक मोठ्ठा highway. न्यू साऊथ वेल्स राज्याला ओलांडून आपण ACT, म्हणजे ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरेटरी मध्ये प्रवेश करतो आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराच्या अगदी बाजूने जातो. 

Snowy Mountains म्हणजे अर्थातच बर्फ! तसा मी हिवाळ्यात हिमालयन ट्रेक केला असल्याने snow आणि  mountains माझ्यासाठी काही नवे नव्हते 😅 पण हा ट्रेक नसून आरामदायी experience होता. Road trip साठी आम्ही एकूण ५ जण. मग आधी एक SUV बुक केली. रेंटल वर. सोबत एक्सट्रा जॅकेट आणि उबदार कपडे घेतले. आणि सकाळी ८ वाजता निघालो. प्लॅन तर सकाळी ६ ला निघायचा होता, पण असो.

तर एकूण बेत असा होता कि आज सिडनीहुन Cooma ला जायचे. कुमा म्हणजे snowy mountains च्या पायथ्याशी एक छोटेसे town. इथेच आमचा मुक्काम. दुपार पर्यंत कुममध्ये पोचायचे आणि जवळच थोडं sightseeing करायचं आणि रविवारी snowy mountains ला जायचे आणि सोमवारी भल्या पहाटे सिडनीला परत निघायचे असा बेत होता.

सिडनीहून चालू झालेला highway म्हणजे एक सुसाट रस्ता. तशी रस्त्यावर इतर वाहने कमीच. २-३ मिनिटांत एखादी गाडी दिसे. रस्ते पण छान. एकदम smooth. एकदा सिडनीच्या बाहेर पडल्यावर पुढे सगळी माळराने. वाटेत मध्येच एक छोटेसे गाव. मग परत अथांग पसरलेली गवताळ कुरणं. म्हणजे हा भाग एवढा सपाट की जिथे नजर टाकाल तिथे फक्त हे meadows दिसतील! बरं तर इथे चराई सुद्धा होत होती. मधेच कुठे घोडे, मधेच गाई बैल तर कधी शेळ्या मेंढ्याचे कळप.

Journey through NSW
Somewhere in NSW
आता ऑस्ट्रेलिया म्हटले की कांगारू आलेच! Zoo मध्ये कांगारू आणि त्याच्या प्रजातींमधले प्राणी पाहिले होते. पण इथे ह्या रस्त्यांवर तर "Kangaroo Prone Area" चे बोर्ड दिसत होते. म्हणजे काही भागात तर कांगारूंचा नुसता सुळसुळाट. मधेच कुठेतरी लांब गवतात त्यांचा एक कळप. असच मजल दरमजल करत, मध्येच थोडे छोटे छोटे halt घेत आमचा प्रवास सुरु होता. Cooma ला जायचा रस्ता ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा मधून जातो. हे राजधानीचे शहर. बऱ्याचजणांकांडून ऐकून होतो की इथे टुरिस्ट स्पॉट्स खूपच कमी आहेत. Administrative work जास्त. बरं तर हे कॅनबेरा म्हणजे सिडनी आणि मेलबर्नच्या बरोब्बर मध्ये. दोन्हीकडून साधारण सारखेच अंतर. खरंतर आम्ही ह्या शहराला वळसा घालूनच पुढे निघालो. १-१:३० पर्यंत आम्ही Cooma मध्ये आलो. आधी लंच करून घेतला आणि मग हॉटेल मध्ये  check -in केलं.

Reception वरील आजीबाई म्हणाल्या की ज्या रस्त्यावरून तुम्ही आलात, तिथेच Cooma चे टुरिस्ट Information Center आहे. ते ३-३:३० पर्यंत बंद होईल. तिथे जाऊन चौकशी करून आज इथेच फिरून घ्या. मग काय, आम्ही निघालो. कूमा तसे छोटेसे town. एक मुख्य रस्ता. त्याच्या दोहो बाजूला hotels आणि दुकाने. मुख्य रस्त्यात २-३ चौक. चौकातून वळलात की residential area. शहराच्या थोड्या बाहेरच्या बाजूस राहायची हॉटेल्स आणि लॉजेस. इंग्रजीत म्हणायचे झाले तर motels.

Driving through streets of Cooma
मग त्या टुरिस्ट सेंटर वर थोडी चौकशी केली. जवळपास काय काय आहे बघायला. Snowy Mountains मध्ये काय बघता येईल. कसे जायचे. किती वाजता जायचे वगैरे. मग ठरवलं की आता सनसेटच्या आधी इकडेच थोडं फिरून घेऊ. जवळच असलेले १-२ पॉईंट्स बघून ६-७ पर्यंत हॉटेल वर येऊ. मग जवळच असलेल्या एक "lookout point" ला गेलो. थोड्या उंचावर होता हा भाग. एक छोटीशी टेकडीच. तशी गाडी अगदी टोकापर्यंत नेता आली. मग पुढे थोड्या पायऱ्या आणि थोड्या झाडीतून वाट काढत ह्या पॉईंट पाशी आलो. इथे बघतो तर काय, समोर सगळं रुक्ष. लांबच लांब पसरला रुक्ष परिसर. ऊन, थोडी झाडी, मधेच ढग, मधेच सावली. अगदी कोपऱ्यात एक छोटे घर. बाकी human activity चे काही निशाण नाही. थोडं हसायलाच आलं. पॉईंटचं नाव "lookout", पण बघायला तसं काहीच नाही! असो.


हा पॉईंट बघून मग परत कूमात प्रवेश केला. आधीच ६-७ तास प्रवास करून थोडा थकवा जाणवत होता. मग सरळ हॉटेल गाठले. थोडा time pass करून, थोडं फ्रेश होऊन, रात्री dinner ला बाहेर पडलो. जवळच एक भारतीय हॉटेल होते, मग काय मजाच. रात्री सगळे लवकरच झोपलो, दुसऱ्यादिवशी Snowy Mountains ला जे निघायचे होते.

-----

सकाळी लवकर उठलो. भराभर आटपून गाडी सुरु केली आणि snowy mountains च्या दिशेनं प्रवास सुरु केला. Snowy Mountains म्हणजे ऑस्ट्रेलिया मधली सर्वात उंच डोंगररांग. इथे ४-५ स्पॉट्स आहेत skiing साठी. काही professional skier साठी तर काही नवशिक्यांसाठी तर काही ठिकाणी असचं बर्फात खेळायला. Thredbo, Perisher, Selwyn वगैरे. त्यात Thredbo हे सगळ्यात प्रसिद्ध आणि ski expert च्या आवडीचे. नवशिके आणि हौशी ह्यांसाठी Perisher हा उत्तम पर्याय. मग आम्ही कुठे जाणार? अर्थात Perisher ला.

Cooma पासून Perisher Valley म्हणजे साधारण १०० km चे अंतर. १.५-२ तासांचा प्रवास. वाटेत आधी बर्फात जाण्यासाठीचे कपडे आणि बूट घेण्यासाठी थांबलो. इथे Cooma च्या बाहेरच काही शॉप्स आहेत जे अश्या गोष्टी रेंट वर देतात. मग सगळ्या आवश्यक गोष्टी घेऊन आम्ही निघालो. वाटेत Jindabyne ह्या छोट्या town मध्ये ब्रेकफास्ट केला आणि Perisher Valley ला ११ पर्यंत पोचलो. इथे पार्किंग आधीच full झालेले. मग थोडं अंतर आधीच आम्ही गाडी पार्क केली. तिथे असलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले की इथेच थांबा, इथून एक बस Perisher च्या मुख्य भागापर्यंत जाते. २ मिनिटांतच बस हजर. आमच्या व्यतिरिक्त बस मध्ये अजून काही इंडियन्स, काही लोकल फॅमिली तर काही skiing करायला आलेले. अगदी ८-१०वर्षांची मुले सुद्धा स्कीईंगचा ड्रेस आणि सेट घेऊन होती.

Perisher चा पहिला भाग म्हणजे एक मोठ्ठे पार्किंग. त्याच्यापुढे २-३ मिनिटं चालत गेलो  की १ फाटा फुटतो. उजवीकडे थोड्या उंचीवर बर्फात खेळायची जागा तर डाव्या बाजूला एका cable car ने स्कीईंग साठी उंचावर जायची सोय.

Perisher Valley
आम्ही तर काही स्कीईंग करायला आलो नव्हतो. आम्हाला फक्त बर्फात खेळायचे होते. आणि बरोबर कॅमेरा होताच. बस्स और क्या चाहिये! मग आमचे photo session सुरु झाले. कधी ह्या अँगल ने तर कधी त्या. उभा, आडवा, हि background, ती background असे असंख्य फोटो काढून झाले. मग म्हटले इथे snowfall तर काही होत नाहीये, मग आपणच फोटो काढायला कृत्रीम snowfall तयार करू 😆.  हातात नुसता कॅमेरा असून चालत नाही, तर थोडं डोकं पण लावावं लागत 😏. 

Me at Perisher
इथे बर्फात भरपूर मजा मस्ती करून झाल्यावर आम्ही आमचा मोर्चा परत वळवला. आधी बस च्या pickup पॉईंट ला आलो, तिथून मग गाडी पार्क केली होती तिथे. एव्हाना दुपारचे २ वाजले होते. विचार केला की Selwyn Resort ला पण जाऊ, ४ पर्यंत तिथे एन्ट्री असते, मग ठरवले की जाऊ दे, वेळेत नाही पोचलो तर उगाच फुकटचा वळसा. मग लंच साठी परत Jindabyne च्या दिशेनं निघालो, जिथे सकाळी ब्रेकफास्ट केला होते तिथेच. 

Jindabyne हे जरी छोटेसे town असले, तरी एकदम मोक्याच्या जागेवर आहे. Cooma हून snowy mountains ला जाताना इथेच halt घ्यायचा. सगळ्या सोयी सुविधा आहेत इथे. आणि मुख्य म्हणजे बाजूलाच असलेला एक मस्त lake. बरोबर गाडी आणि हातात कॅमेरा! आपण सेट!

Jindabyne lake आणि मी
Jindbayne ला मस्त लंच करून आम्ही मग परत कूमा कडे निघालो. परत २-२.५ तासांचा प्रवास. संध्याकाळपर्यंत कूमा गाठले. मग फ्रेश होऊन डिनरसाठी जवळच एका Chinese हॉटेल मध्ये गेलो. हे कूमा मला नक्कीच आवडले. छोटे का होईन, मस्त town होते.

Cooma at night
रात्री जरा लवकरच झोपलो. सोमवारी सकाळी सिडनीला आम्ही भल्या पहाटे निघणार होतो. एकूणच ऑस्ट्रेलियातला शेवटचा वीकएंड एकदम भारी होता. Cooma, Roadtrip, Snowy Mountains आणि खूप photos. बघता बघता ३ महिने संपत आले. आठवड्याचे ५ दिवस भरपूर काम आणि वीकएंडला फिरणं. १०-१२ आठवडे मस्त मजा करून झाली. आता मात्र माझी मायदेशी परतायची वेळ झाली होती. बॅक टू इंडिया!

The End

Post a Comment

3 Comments