पारो आणि टायगर्स नेस्ट
सकाळी फोबजिकाच्या valley चं शांत सौंदर्य पहिल्यांदा खिडकीतून डोळ्यात साठवलं. नाश्त्याला साधं ब्रेकफास्ट होतं – गरमागरम चहा आणि आलू पराठा. हळूहळू थंड हवेतून निघालो, आणि पारोकडे प्रवास सुरू केला. फोबजिकाला निरोप देताना तिथल्या शांततेचा आणि निसर्गसौंदर्याचा क्षणभर विचार मनात घोळत होता.
फोबजीका व्हॅली वरून परत निघताना |
प्रवास मोठा होता, आणि मधल्या वेळेत थोडी भूक लागली. आम्ही एका छोट्याशा roadside restaurant वर थांबलो. भूतानी आणि North-Indian खाऊन आता जरा कंटाळा आला होता. म्हटलं आज जरा वेगळं खाऊ. मग Chinese starters, Pizza आणि Ramen bowl ची ऑर्डर दिली. रेस्टॉरंट पण मस्त होतं. service, ambiance आणि view एकदम झकास.
Pizza आणि Ramen |
संध्याकाळच्या सुमारास आम्ही पारोला पोचलो. पारो हे भूतानमधलं एक खूप सुंदर आणि महत्त्वाचं शहर आहे. पारो विमानतळ, जो डोंगरांनी वेढलेला आहे, तो जगातल्या सगळ्यात challenging विमानतळांपैकी एक मानला जातो. इथे पोचल्यावर हॉटेलमध्ये check-in केलं आणि सामान ठेवलं. थोडा आराम करून आम्ही पारोच्या बाजारात भटकायला बाहेर पडलो.
तसं म्हटलं तर पारो म्हणजे छोटं Town च. मुख्य रस्त्यावर मार्केट आणि आजू बाजूला कॅफे, हॉटेल्स आणि शॉप्स. शहराच्या बाहेर एअरपोर्ट, मंदिरं, प्रशाकीय इमारती वगैरे. मग असाच एक फेरफटका मारत हिंडत बसलो 😁.
पारोचा बाजार छोटा पण खूप lively आहे. इथे रंगीत मास्क्स, लाकडाच्या वस्तू, आणि हाताने बनवलेल्या शॉल्स अशा बऱ्याच वस्तू होत्या. एका cute कॅफेमध्ये coffee घेतली आणि तिथल्या लोकांशी गप्पा मारल्या. पारोच्या बाजारात फिरताना एक souvenir shop आवडला, जिथून आम्ही fridge magnets आणि एक छोटं बुद्धाची मूर्ती विकत घेतली.
पारो market आणि Mountain Cafe |
दुसऱ्या दिवशी पारोच्या सगळ्यात प्रसिद्ध जागेला भेट द्यायची होती – टायगर्स नेस्ट.
-----
सकाळी उठून हलकं ब्रेकफास्ट केलं आणि trek साठी तयार झालो. टायगर्स नेस्ट म्हणजे डोंगराच्या कड्यावर असलेली एक भव्य आणि प्रसिद्ध monastery. ह्याचं नाव Paro Taktsang.
टायगर्स नेस्टचा ट्रेक साधारण ५-६ तासांचा आहे. हॉटेल पासून साधारण ४०-५० मिनिटं गाडीने प्रवास करून आम्ही पायथ्याला पोचलो. सोबत आमचा guide होताच. तिकीट काढलं, trekking-pole म्हणून बांबूच्या काठ्या घेतल्या.
सुरुवातीला रस्ता थोडा सोपा वाटला, पण जसं वर जायला लागलो, तसा आव्हानात्मक झाला. रस्त्याच्या कडेने दिसणारे हिमालयाचे डोंगर आणि हिरवीगार झाडं मन मोहून टाकत होती. तसे बऱ्यापैकी trekkers होते. सगळ्या वयाचे. काही स्वतःहून ट्रेक करत येत होते तर काही घोड्यांवर बसून. वाट तशी एकदम well-marked. मधेच घनदाट जंगल, मधेच clearing, मधेच छोट्या पायऱ्या, मधेच पायवाट असं करत ट्रेक चालू होता.
निकिता, ट्रेक करताना 😁 |
वाटेत एका कॅफेवर थांबलो, तिथे गरमागरम चहा घेतला. इथून monastery आता दृष्टीत आली होती. तरी अजून अर्धा ट्रेक बाकी होता. १०-१५ मिनिटं ब्रेक घेऊन ट्रेक पुन्हा सुरु केला.
टायगर्स नेस्ट |
अजून तासाभरात Tigers Nest च्या अगदी जवळ आलो आणि समोरचं दृश्य पाहून थकवा एकदम नाहीसा झाला. डोंगराच्या कड्यावर असलेली monastery इतकी सुंदर होती की त्याकडे पाहतच राहिलो. इथे तर फोटो-पॉईंट होता. मस्त background मध्ये monastery. हा भाग जरा उंचावर होता, म्हणजे आता इथून पुढे पायऱ्या उतरून मग पुढे जायचं. शेवटी टायगर्स नेस्टच्या जवळ पोचलो, एका बाजूला मस्त धबधबा आणि दुसऱ्या बाजूला दरी आणि समोर भव्य Paro Taktsang.
टायगर्स नेस्टच्या जवळचा धबधबा |
Finally आम्ही monastery मध्ये पोचलो. इथे मोबाइल, bags, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे काही allowed नाही. त्यामुळे आत मध्ये फोटो काढायचा प्रश्नच नाही. पण बाकी monastery प्रमाणेच भव्य आणि शांत. एक मस्त peaceful vibes. साधारण ३०-४० मिनिटे फिरून झाल्यावर आम्ही परतीचा ट्रेक चालू केला.
वाटेत थोडा रिमझिम पाऊस सुरु झाला. दीड एक तासात परत त्या कॅफे मध्ये आलो. कॅफे कसला, restaurant च. इथे buffet लंच घेतला. Rice, Noodles, Salad, Ema Datshi, Boiled Eggs वगैरे. Lunch करून परत ट्रेक चालू केला. साधारण ४:३०-४:४५ ला परत base ला आलो. ट्रेक पूर्ण केल्यानंतर थोडा थकवा जाणवत होता. हॉटेलमध्ये परत येऊन गरम शॉवर घेतला आणि साधं पण चविष्ट डिनर घेतलं.
पारोचा हा दिवस भूतानच्या निसर्ग, संस्कृती, आणि इतिहासाचा खास अनुभव देणारा होता. टायगर्स नेस्टचा ट्रेक म्हणजे cherry on cake! पुढचा दिवस पारो explore करायला आणि परतीच्या प्रवासाचा. प्रवास जवळजवळ संपत आला, पण आठवणी मात्र कायमच्या मनात कोरल्या गेल्या.
क्रमश:
0 Comments