भूतान : भाग 6

पारो आणि परतीचा प्रवास


आमच्या भूतानच्या प्रवासाचा शेवटचा दिवस सुरू झाला पारोच्या exploration ने. आज जरा दिवस आरामात होता. मस्त ब्रेकफास्ट, मग checkout, मग भूतानची सर्वात जुनी monastery, मग पारो मार्केट आणि मग ५-६ तासाचा परतीचा प्रवास. आज ब्रेकफास्ट छोले-पुरी, ब्रेड टोस्ट, ऑम्लेट आणि as usual फ्रेश फळं. इथे आता ब्रेकफास्टला रोज फळं खायची सवयीचं लागली होती 😋. 

ब्रेकफास्ट at पारो

ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही पारोमधल्या किचू ल्हाखांग (Kyichu Llakhang) या भूतानमधल्या सगळ्यात जुन्या Buddhist Temple. हे temple साधारण ७व्या शतकात बांधलं गेलं आहे आणि भूतानच्या बौद्ध संस्कृतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तिथल्या शांततेने मन भारावून गेलं. इतर मंदिरं आणि monastery प्रमाणे इथेही बौद्ध शिल्पं आणि बरंच काही. आमच्या guide ने नेहमीप्रमाणे ह्या मंदिराचा इतिहास आणि इतर गोष्टी सांगितल्या.

Kyichu Llakhang

मग इथून पूढे निघून परत आलो पारो मार्केटला.  परवा रात्री पाहिलेलं मार्केट आणि आता सकाळचं मार्केट. एकदम different. रात्री मस्त lighting आणि एक वेगळी vibe. आता सकाळी मस्त कोवळं ऊन आणि शांत vibe. काही कसली घाई नाही. Tourist लोकांची गर्दी तर एकदमच कमी. आम्ही परत थोडे काही छोटे souvenirs घेतले. पुनाखा ला आमच्या guide ने आम्हाला चिकनचं लोणचं दिलं होतं, टेस्ट करायला. मग विचार केला इथे अजून कोणती वेगळी लोणची आहेत का ते पाहू. त्यात मग आम्ही कांदा-लसूण लोणचं आणि नागा मिरचीचं लोणचं विकत घेतलं. तेवढंच जरा वेगळं काहीतरी. 

पारो मार्केट

साधारण ११-११:३० ला आम्ही पारोला निरोप दिला आणि गाडीने फुन्सोलिंगकडे प्रवास सुरू केला. डोंगरांमधून जाणाऱ्या रस्त्यांवरून दिसणारा निसर्गाचा नजारा पाहून मन अगदी भरून आलं. मध्ये लंच साठी १ छोटा halt घेतला. संध्याकाळी फुन्सोलिंगला पोचलो. पुन्हा एकदा भारत-भूतानचा border पार केला. भारतात आल्यावर वातावरणात आणि गजबजाटात लगेच फरक जाणवला 😅. एव्हाना ४:३०-५ झाले होते. आजचा stay जयगाव मधेच होता. Dinner ला मस्तपैकी बंगाली फिश करी, रोटी सब्जी, दाल भात. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून, ब्रेकफास्ट करून साधारण ९:३० ला हॉटेलमधून checkout केलं आणि गाडीने जयगावहून बागडोगराकडे प्रवास सुरू केला. रस्त्यातल्या हिरवाईने आणि हळूहळू दिसणाऱ्या गजबजलेल्या भारतीय गावांनी वेगळाच अनुभव दिला. बागडोगरा विमानतळावर पोहोचल्यावर थोडासा प्रवासाचा थकवा जाणवला, पण भूतानच्या आठवणी मनात असल्याने त्याची जाणीव फारशी झाली नाही. पण पुढचा प्रवास परत hectic होता. Direct flight नसल्याने आम्ही बागडोगरा - दिल्ली - मुंबई असं जाणार होतो. तरी दिल्ली - मुंबई flight delay झाल्यानं शेवटी दुसऱ्या दिवशी रात्री/पहाटे २-२:३० ला घरी पोचलो 😓. 

---

Overall भूतान was something totally different. ही टूर एक अशी mix package होती. Luxury, adventure, road trips, food, culture आणि मुख्य म्हणजे शांत अँड relaxing!

Post a Comment

0 Comments