भूतान : भाग ४

फोबजीका व्हॅली



पुनाखामधल्या हॉटेलच्या खिडकीतून दिसणाऱ्या नदीचा आणि डोंगरांचा view पाहत आम्ही सकाळी उठलो. ब्रेकफास्ट झाल्यावर सामान पॅक केलं आणि फोबजिकाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. हा प्रवास एका valley मध्ये जाण्याचा होता. प्रवास म्हणजे long drive. भूतानचे smooth रस्ते, बाजूने वाहणारी पुनाखा नदी आणि आजू बाजूचे डोंगर. भूतानचा प्रवास म्हणजे जणू काही आपण travel film च experience करतोय कि काय असं वाटतं. 

पुनाखा ते फोबजीका प्रवास 

प्रवास सुरू झाल्यावर काही वेळाने आम्ही एका छोट्या local market वर थांबलो. तिथे विविध प्रकारचे handicrafts, ताज्या भाज्या आणि फळं विकायला होती. स्थानिक लोकांनी स्वतः बनवलेले शॉल्स, टोप्या, आणि लाकडाच्या वस्तू खूप आकर्षक वाटल्या. तिथे आम्ही काही फळं आणि snacks घेतले. 

यानंतर आम्ही सामतेन्गांग (Samtengang) या गावात थांबलो. हे लहानसं, शांत आणि सुंदर गाव भूतानच्या संस्कृतीचं एक प्रतिक आहे. तिथल्या एका लहान तलावाभोवती आम्ही थोडा वेळ फिरलो. म्हणजे तलावाच्या बाजूला असा चालायला एक track केलेला. मधेच बसायला बाकं. बाजूलाच Buddhist prayer flags अडकवलेले. एक असं calm आणि peaceful वातावरण होतं. जास्त थंडी पण नव्हती. त्यात मस्त ऊन. जवळच शाळा होती. काही वर्ग शाळेच्या building मध्ये चालू आहेत तर काही इथे open मध्ये. एकूणच मस्त वाटलं.  

lake ला फेरफटका मारताना

दुपारच्या जेवणासाठी आम्ही आमच्या ड्रायव्हरच्या घरी गेलो. भूतानी लोकं खूप साधं पण चविष्ट जेवण करतात. तिथे लाल तांदूळ, spicy भाजी, चिकन आणि पोर्क करी, आणि काही त्यांच्या बागेत पिकवलेल्या भाज्या आणि फळं. चिकन आणि पोर्क करी हि भूतानी लाल मिरची आणि मसाल्यात बनवली होती. एक नंबर! सोबत काकडीचं सॅलड, पालकचं सॅलड, ओर्चीड आणि बीफ करी, हिरवी आणि लाल मिरचीचा ठेचा. सोबत भूतानी चहा. आणि शेवटी फलाहार म्हणून पेर. त्यांच्या कुटुंबासोबत बसून गप्पा मारल्या, आणि भूतानच्या culture आणि overall lifestyle बद्दल अजून माहिती मिळाली. जेवण मस्त होतं, पण hospitality खूपच विशेष होती.

विविध पदार्थांचा थाट

bowl full meal

दुपारनंतर आम्ही फोबजिकाच्या दिशेने प्रवास सुरू केला. हा प्रवास winding roads आणि डोंगरातून जाणारा होता. आधीच पोटभर जेवण, त्यात मस्त प्रवास,छान डुलकी दिली 😁. पुढे फोबजीकाच्या जवळ पोचल्यानंतर आम्ही आधी Gangtey Monastery ला भेट दिली. ही  Monastery फोबजिकाच्या दरीतल्या टेकडीवर आहे, आणि तिथून दिसणारं valleyचं दृश्य अविस्मरणीय आहे. इथली शांतता आणि वातावरण पाहून एकदम छान वाटलं. भूतानी बौद्ध संस्कृतीचं प्रतीक असलेल्या या Monastery मध्ये आमच्या guide ने बौद्ध धर्माबद्दल भरपूर माहिती सांगितली.

Gangtey Monastery

फोबजिकामध्ये Black-Necked Crane पक्ष्यांसाठी साठी प्रसिद्ध Crane Center आहे. हिवाळ्यात इथे खूप सारख्या क्रेन्स migrate होतात. सेंटरमध्ये आम्हाला क्रेन्सबद्दल माहिती देणारी एक छोटी documentary दाखवली गेली. दुर्बिणीतून आम्ही पक्षी बघायचा प्रयत्न केला खरा, पण अत्ता season नव्हता. पर्यावरण आणि पक्ष्यांचं संरक्षण भूतानी लोकांसाठी किती महत्त्वाचं आहे, हे तिथं जाणवलं. त्यात माझ्यासारख्या bird watchers आणि bird photographers ना हि जागा म्हणजे स्वर्गच!

Phobhijka Valley

संध्याकाळी आम्ही हॉटेलमध्ये चेक-इन केलं. हे हॉटेल valley मध्ये होतं, आणि खिडकीतून दिसणारं दृश्य जबरदस्त होतं. रात्री डिनरला साधं रोटी-सब्जी आणि डाळ-भात असं जेवण. इथे थंडी म्हणजे काय विचारू नका. हॉटेल रूम मध्ये तर हीटर आणि fire-place. हॉलिवूड movies मध्ये पाहतो तश्या बेडरूम्स. बाहेर फक्त बर्फ पडणं बाकी होतं एवढी थंडी!

आमची बेडरूम

फोबजिकाचा हा दिवस निसर्ग, संस्कृती, आणि भूतानी लोकांच्या hospitality ने भरलेला होता. एकूणच असा mix आणि थोडा relaxing day होता. उद्या पुढचा प्रवास पारो च्या दिशेनं. 

क्रमश:

Post a Comment

0 Comments