भूतान : भाग ३

पुनाखा


थिम्फूचं थंड हवामान, हॉटेलच्या खिडकीतून दिसणारे डोंगर, आणि शांत वातावरणात आम्हाला सकाळी उठायला मजा आली. ब्रेकफास्टला गरमागरम ब्रेड बटर, मस्त छोले भटुरे आणि थंड रसाळ गोड कलिंगड. हे सगळं खाऊन आम्ही पुनाखाच्या दिशेने निघालो. पुनाखा म्हणजे भूतानची जुनी हिवाळी राजधानी आणि तिथे पोहोचण्याचा प्रवासही खूप सुंदर. 

morning views from hotel

थोड्याच वेळात आम्ही दोचुला पासला पोचलो. ३१०० मीटर उंचीवर असलेला हा पास डोंगरांमध्ये आहे, आणि तिथल्या १०८ चोर्टेन्स (स्तूप) खूपच सुंदर दिसतात. हे स्तूप भूतानच्या सैनिकांच्या सन्मानार्थ बांधले गेले आहेत. तिथून हिमालयाचं अप्रतिम दृश्य दिसतं, पण त्या दिवशी थोडं cloudy होतं. तरीही तिथल्या थंडगार वाऱ्यात आणि सुंदर परिसरात वेळ घालवणं खूप peaceful वाटलं.

दोचुला १०८ chortens

दोचुला पासनंतर थोड्या वेळाने आम्ही एका छोट्या लोकल मार्केटला थांबलो. तिथे भूतानी लोक विकायला ठेवलेली फ्रेश veggies आणि फळं दिसली. रंगीत भोपळे, लाल मिरच्या, पालक, आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं पाहून आम्हाला तिथे थोडं फिरायची मजा आली. एकूणच भूतान मध्ये फळ आणि भाज्या ह्यांची चंगळ. म्हणजे खाण्यातही मस्त सॅलड वगैरे, breakfast भरपूर फळं आणि मुख्य म्हणजे सगळं fresh आणि organic.

Bhutanese veggies and fruits 

मार्केटनंतर आम्ही पुनाखा Wildlife Sanctuary ला भेट दिली. हा sanctuary जंगलांनी भरलेला, वेगवेगळ्या पक्षी आणि प्राण्यांचं घर आहे. आम्हाला तिथे काही पक्षी आणि हरिण दिसले. भूतानची निसर्गप्रेमी लोकसंस्कृती अशा sanctuaries च्या माध्यमातून अधिक स्पष्ट होते. इथे मस्त मोठी तळी आणि बाजूला चालायला पायवाट. काही पायवाटा पुढे trek ची सुरवात करतात. तळ्यांच्या बाजूला day picnic करायला किंवा camping साठी मस्त जागा. एकूणच सगळं well managed.

दुपारच्या लंचला आम्ही एका छोट्या कॅफेत fried rice आणि momo खाल्ले. लंचनंतर आम्ही थोडा छोटा ट्रेक केला "चिमी लाखांग" – फर्टिलिटी टेम्पलला. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे लोक मूलंबाबत प्रार्थना करायला येतात. ट्रेक करताना हिरव्यागार शेतातून जाणारा रस्ता आणि आजूबाजूची शांतता अनुभवायला मिळाली.

पुनाखा Dzong

यानंतर आम्ही पुनाखा Dzong भेट दिली. भूतानचं हे एक historical आणि architectural marvel आहे. दोन नद्यांच्या संगमावर बांधलेला हा Dzong खूपच भव्य आहे. रंगीत लाकडी रचना, तिथल्या भिंतींवरची चित्रं, आणि शांत नदीकाठी वारा हे सगळं खूप सुंदर होतं. Tar Dzong म्हणजे एक किल्लाच. आतमध्ये palace आणि काही बौद्ध मंदिरं. इथे फिरून राजस्थानी palaces ची आठवण झाली. अगदी same. फरक एवढाच कि इथे सगळी भूतानी शैली. 

पुनाखा Dzong

पुनाखा डोंगच्या जवळचं "सस्पेंशन ब्रिज" हा सुद्धा एक must-visit आहे. नदीच्या वर लोंबकळणारा हा पूल चालताना हलतो, पण तिथून दिसणारं दृश्य अप्रतिम आहे. डोंगर, नदी, आणि हिरवीगार झाडं पाहताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही.

suspension bridge वरती मी

तिथून परतताना आम्ही एका छोट्या टपरीवर tea break घेतला. गरमागरम beef momos, spicy maggi, आणि चहा घेतला. थंड हवेत हे खाणं म्हणजे पर्वणीच होती. भूतानी momos खूपच tasty असतात, आणि त्यांचं मसाल्यांचं प्रमाण परफेक्ट वाटलं. गेल्या ३-४ दिवसांतच २-३ वेळा खाऊन झाले होते 😁. 

संध्याकाळी आम्ही हॉटेलमध्ये पोचलो. इथलं हॉटेल साधं, पण खूप comfortable होतं. डिनरला आम्ही fish curry, रोटी-सब्जी, डाळ-राईस असं जेवण घेतलं. हॉटेलच्या खिडकीतून दिसणारे डोंगर रात्रीच्या अंधारातही खूपच सुंदर वाटत होते. थिंफू पेक्षा इथे जरा जास्त थंडी जाणवत होती. 

Fish for dinner

पुनाखाचा हा दिवस निसर्ग, इतिहास, आणि संस्कृतीने भरलेला होता. दोचुला पासचं सौंदर्य, फर्टिलिटी टेम्पलचा अनुभव, पुनाखा डोंगचं भव्यपण, आणि suspension bridge वरचं adventure – हे सगळं मस्त होतं. पुढच्या दिवशी फोबजिकाच्या दिशेने प्रवास करायचा होता, new day for new adventures!

क्रमश:

Post a Comment

1 Comments

  1. Loved reading this!! Can't wait to visit that place one day.

    ReplyDelete