भूतान : भाग २

थिम्फू


थिम्फू – भूतानची राजधानी. शांत, सुंदर आणि एका unique vibe असलेलं ठिकाण! थंडगार थिम्फूच्या हवेत आम्हाला पहाटेच जाग आली. खिडकीतून दिसणारं पर्वतांचं दृश्य पाहून उत्साह वाढला. ब्रेकफास्टसाठी हॉटेलच्या कॅफेत गेलो. ब्रेकफास्टला साधं, हॉटेल्सच एकदम standard असा ब्रेकफास्ट स्प्रेड होता. चहा-कॉफी, ब्रेड बटर, ऑम्लेट, पुरी भाजी वगरे. सगळ्यात मस्त म्हणजे fruits. थंडगार, रसाळ आणि गोड असे कलिंगडाचे काप. बघूनच कळत होतं हे एकदम fresh आणि natural आहे ते. नाहीतर आपल्याकडे सगळं chemical घालून रंगवलेलं. पोट भर ब्रेकफास्ट करून आम्ही तयार झालो ते थिंफू site-seeing साठी. 

थिम्फूचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे त्याची प्रसिद्ध बुद्ध मूर्ती - "बुद्धा डॉर्डेनमा". ५१ मीटर उंच bronze ची ही भव्य मूर्ती टेकडीवर उभी आहे, जिथून थिम्फूचं सुंदर दृश्य दिसतं. बुद्धाच्या शांत चेहऱ्यावरून positivity मिळते आणि तिथला परिसरही अगदी शांत आहे. थिम्फूचं हे दृश्य म्हणजे डोंगरांनी वेढलेलं, हिरव्यागार जंगलात असलेलं एक छोटं शहर – अगदी postcard-worthy दृश्य.

बुद्धा डॉर्डेनमा

भूतानमध्ये Buddhism हा मुख्य religion आहे, आणि इथले लोक त्यांचं जीवनही त्याच्यावर आधारित ठेवतात. इथली शांती, स्वच्छता, आणि समाधानी जीवनशैली पाहून आम्ही भारावून गेलो.

बुद्धा डॉर्डेनमा

बुद्ध मूर्तीच्या जवळचं एक लहान हिंदू मंदिरालाही आम्ही भेट दिली. भूतानमध्ये बौद्ध धर्म dominant असला तरी इथे हिंदू मंदिरेही सांभाळली जातात. हे मंदिर छोटं होतं, पण त्यात एक साधेपणा होता. भूतानच्या शांत आणि सर्वधर्मसमभाव संस्कृतीचं ते एक उदाहरण होतं.

थिंफू मधलं हिंदू देऊळ

यानंतर "सिम्पली भूतान" ला गेलो. हे एक cultural museum आहे जिथे भूतानी संस्कृतीचं दर्शन होतं. इथे पारंपरिक भूतानी घरं, हस्तकला, आणि जीवनशैली पाहता येते. भूतानी लोकांचे traditional पोशाख गो (पुरुषांसाठी) आणि किरा (स्त्रियांसाठी) वगैरे. इथे स्वागताला भूतानची wine दिली. नंतर थोडा traditional डान्स पहिला. बरोबर इकडचा प्रसिद्ध butter tea प्यायला. भूतानमधल्या लोकांची जीवनशैली किती साधी, पण सांस्कृतिक दृष्ट्या किती समृद्ध आहे, हे इथे बघायला मिळालं.

Simply  Bhutan : भूतानी kitchen आणि सामग्री

दुपारचं लंच local भूतानी रेस्टॉरंटमध्ये घेतलं. इथे tourist कमी आणि भूतानी लोकं जास्त. आम्ही आमच्या ड्रायव्हर आणि गाइडसोबत बसून जेवण share केलं. ताटात लाल तांदूळ, चिकन, बीफ, पोर्क, विविध भाज्या, पालक आणि spicy लाल मिरच्याची चटणी होती. भूतानी लोकांना मिरच्या खूप आवडतात, त्यामुळे त्यांच्या पदार्थांना एक वेगळीच तिखट चव असते. भूतानचा प्रसिद्ध पदार्थ Ema Datshi सुद्धा खायला मिळाला. म्हणजे भाज्या, चीज आणि लाल मिरची पासून बनवलेला पदार्थ. जेवण एकदम साधं असलं तरी त्यातल्या spice आणि flavor मुळे heavy वाटलं. जेवणाबरोबर शेवटी ताक सुद्धा होतं!

भूतानमध्ये लोक simple food खातात, पण त्यांच्या पदार्थांत एक distinct taste असतो, जो खास भूतानी spices मुळे येतो.

भूतानी food

लंचनंतर आम्ही एक arts आणि crafts institute ला गेलो, "National Institute for Zorig Chusum". जिथे स्थानिक विद्यार्थ्यांना भूतानी कला शिकवली जाते. थिम्फूमधल्या या इन्स्टिट्यूटमध्ये painting, शिल्पकला, थांका पेंटिंग (धार्मिक चित्रकला) आणि अजून बऱ्याच कला शिकवल्या जातात. इथल्या विद्यार्थ्यांचं dedication पाहून खूप छान वाटलं. भूतानची कला त्यांचं संस्कृतीतलं योगदान सांगते, त्यात spirituality आणि tradition दिसून येतो.

विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात मग्न - wooden crafts

इथून पुढे आम्ही थिम्फूचं एक सुंदर view point गाठलं. तिथून संपूर्ण थिम्फू शहर दिसत होतं – डोंगरांनी वेढलेलं, नदीच्या बाजूने पसरलेलं शांत, सुंदर शहर. थंड हवेत थिम्फूचं सुंदर view पाहणं म्हणजे perfect ending होती दिवसाची. थिम्फू छोटं असलं तरी प्रत्येक कोपऱ्यात सुंदरता आहे.

कॅमेऱ्यात थिंफूचे views टिपताना  

यानंतर आम्ही थिम्फूच्या छोट्या झूलाही भेट दिली, ज्याला मोतिथांग ताकिन प्रिझर्व्ह किंवा Royal Takin  Zoo म्हणतात. हे खास भूतानच्या राष्ट्रीय प्राणी ताकिनसाठी बनवलेलं sanctuary आहे. ताकिन हा खूप unique दिसणारा प्राणी आहे – डोक्याचा आकार बकरीसारखा, आणि शरीर लांबट, जाडसर. ताकिनचा उल्लेख बऱ्याच स्थानिक कथा-कथांमध्ये सापडतो.

ताकिनशी जोडलेली एक गोष्ट खूप गमतीशीर आहे. लोककथेनुसार, भूतानचे संत ड्रुकपा कुन्ले यांनी एका गायीच्या आणि बकरीच्या हाडांचा उपयोग करून ताकिन तयार केला! त्यामुळे ताकिनला भूतानमध्ये खूप महत्त्व आहे, आणि तो भूतानी लोकांसाठी सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे.

इथून आम्ही मोर्चा वळवला तो आमच्या Hotel Ugyen कडे. आज भरपूर site-seeing झालं, खूप  फोटो काढले.  हॉटेल मध्ये जाऊन थोडं फ्रेश होऊन ६-६३० च्या दरम्यान मस्त Hot Chocolate आणि Sandwhich वर ताव मारला. तसा dinner ९ ला होता, पण भूक पण लागली होती 😁. 

भूतानच्या पहिल्या दिवसात आम्ही थिम्फूचा essence घेतला – बुद्ध मूर्तीचं भव्य दृश्य, भूतानी जीवनशैलीचा अनुभव, local dishes आणि थिम्फूचं शांत वातावरण. पुढे पुनाखाच्या प्रवासात अजून काही खास अनुभव घ्यायचे excitement होतं!

क्रमशः

Post a Comment

0 Comments