भूतान : भाग १

मुंबई ते थिम्फू - भूतान प्रवासाचा पहिला अनुभव!



मार्च २०२४ मध्ये मी आणि निकिता दुबईची ट्रिप करून आलो होतो, पण त्यानंतर ऑफिसच्या कामात असे अडकलो की अजून कुठेही सुट्टीसाठी जाता आलं नव्हतं. काहीतरी वेगळं बघायला हवं होतं, शांतता अनुभवायला हवी होती – म्हणून भूतान हा अगदी परफेक्ट ऑप्शन वाटला! Natural beauty, landscapes, food आणि एक वेगळ्या culture चा experience घेण्यासाठी परफेक्ट ठिकाण! बऱ्याच itinerary चाळत शेवटी  "T Trikon" सोबत एक customized tour चा प्लॅन केला. 

शनिवारी १9 ऑक्टोबर, सकाळी लवकरच मुंबई विमानतळावर पोहोचलो. फ्लाइटमध्ये बसलो, आणि साधारण ११ वाजता बागडोगराला पोहोचलो. अगोदरच बुक केलेल्या गाडीने जयगावसाठी निघालो. जयगाव म्हणजे भारत - भूतान border. बागडोगराहून जयगावला पोहोचायला साधारण ४ वाजले. प्रवासात हिरवीगार झाडी, पर्वत, आणि छोट्या गावांचा अनुभव घेतला. संध्याकाळी  जयगावमध्येच थांबलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी भूतानच्या फुन्टशोलिंग border वरून पुढे जायचं होतं. संध्याकाळी ६-७ वाजता धो धो पावसाला सुरवात झाली. पण बरं झालं. तेवढाच गारवा 😅. 

बागडोगरा मधली संध्याकाळ

दुसऱ्या दिवशी, म्हणजे रविवारी, सकाळी साधारण ९-३०-१० वाजता सीमारेषा ओलांडली. भूतानमध्ये फिरायचं म्हणजे guide हवाच. तर आमचा guide चेतेन (Cheten) ला भेटलो आणि भारताच्या गजबजलेल्या वातावरणातून जणू एकदम शांत, स्वच्छ आणि साध्या परिसरात आलो. फॉर्मॅलिटीज पूर्ण करून भूतानमध्ये प्रवेश केला.

सीमा ओलांडून आमचा प्रवास सुरु झाला तो थिंफू च्या दिशेनं. थिंफू म्हणजे भूतान ची राजधानी. प्रवास साधारण ४-५ तासांचा. म्हणजे मध्ये lunch आणि चहा साठी ब्रेक आणि थोडे view points. एव्हाना पाऊस सुरु झाला होता. थंड हवा, धुकं, गारवा, मस्त हिरवाई आणि डोंगर दऱ्यांतून प्रवास. 

प्रवासाची सुरुवात ह्यापेक्षा अजून चांगली असूच शकत नाही

साधारण १२३०-१ ला गेडू (Gedu) गावाजवळ एका छोट्याशा कॅफेमध्ये lunch म्हणून noodles आणि मस्त momo खाल्ले. जवळच असलेल्या Buddhist स्तूपांना भेट दिली. त्यानंतर थिम्फूच्या प्रवासाला परत सुरुवात केली.

Buddhist स्तूप

फुन्टशोलिंगपासून थिम्फूपर्यंतचा प्रवास म्हणजे निसर्गातली सफर होती. आम्ही रस्त्यात काही सुंदर view points वर थांबलो, घाटमाथ्यावरून दिसणारे दृश्य मन मोहून टाकणारं होतं. थंडीमुळे मध्येच एका छोट्याशा कॅफे वर गरम चहा घेतला – थंड हवेत हा चहा पिण्याची मजा काही औरच होती.

निकिता cafe च्या  बाहेर बसून view enjoy करताना


वाटेतला एक मस्त धबधबा

संध्याकाळपर्यंत थिम्फूला पोहोचलो आणि Hotel Ugyen मधे चेक-इन केलं.

खिडकीतून बाहेर बघितलं आणि थिम्फूचं ते दृश्य एकदम स्वप्नासारखं वाटलं. खिडकीतून दिसणारेडोंगर आणि त्यांच्या पायथ्याशी पसरलेलं शांत थिम्फू शहर सुंदर वाटत होतं. थंड हवेत गरम ब्लँकेटमध्ये लपेटून बाहेरचं दृश्य पाहणं... क्या बात. 

थिम्पू at night 

भूतानच्या प्रवासाची ही सुरुवातच खूप खास होती. Calmness, natural beauty आणि एक वेगळं culture जाणवायला सुरुवात झाली होती. गेले २ दिवस सततचा प्रवास करून आता जरा थकवा जाणवत होता. मग काय, मस्तपैकी dinner करून we called it a day.  

क्रमश:

Post a Comment

3 Comments

  1. खूप सुंदर प्रवास वर्णन 👌🏻

    ReplyDelete
  2. झकास वर्णन

    ReplyDelete
  3. Beautifully written!

    ReplyDelete