उदयपूर : सिटी पॅलेस आणि बरंच काही
आज १६ डिसेंबर, सकाळी उठून, फ्रेश होऊन मस्तपैकी buffet breakfast ला गेलो. राजस्थानी पोहे, ढोकळा, छोले-भटुरे, fruits आणि चहा-कॉफी. आज उदयपूर sightseeing चा दिवस. साधारण ९ च्या आसपास हॉटेल मधून निघालो. आजचा कार्यक्रम म्हणजे करणी माता मंदिर, जगमंदिर आणि बोट राईड, सिटी पॅलेस, विंटेज कार म्युझिअम, शॉपिंग आणि बरंच काही.
उदयपूर मध्ये दोन मुख्य भाग, एक म्हणजे जुनं शहर. तिथे जायचं तर रिक्षा करा किंवा चालत जा. कारण असं की जुने रस्ते अगदीच छोटे, तिथे फक्त दुचाकी किंवा रिक्षा जाऊ शकेल एवढीच जागा. त्यात आम्ही आधीच टॅक्सी बुक केलेली. मग म्हटलं जाऊदे, जेवढं फिरता येईल तेव्हढं फिरू.
तर ९३० पर्यंत करणी माता मंदिराच्या पायथ्याशी आलो. इथून वर जायला एक छोटा ropeway. उंच डोंगरावर मंदिर आहे आणि तिथून संपूर्ण उदयपूरचा ३६० degree view दिसतो. Ropeway च तिकीट काढून अगदी १०-१५ मिनिटांत mountain top ला पोचलो. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर थोडी तटबंदी आणि टेहेळणीला असतो तसा बुरुज असं साधारण बांधकाम दिसत होतं. इथून उदयपूरचा मस्त नजारा दिसत होता. निळेशार लेक, त्यात मधोमध ताज हॉटेल आणि जगमंदिर, दुसरीकडे सिटी पॅलेस, तिसऱ्या बाजूस बाकीचं नवीन शहराचा भाग. मंदिरात जाऊन दर्शन घेऊन थोडे फोटो काढून परत ropeway ने खाली आलो.
करणी माता मंदिर |
मग थोड्या वेळातच एक चौपाटी वजा जागेवर आलो. जागेचं नाव दूध-तलायी चौपाटी. म्हणजे इथे ह्याच नावाचा एक छोटासा असा लेक आहे. चौपाटी पेक्षा आपल्या मुंबईच्या मारिन ड्राईव्ह सारखा भाग. चालायला आणि बसायला भरपूर जागा, समोर दिसणारं ताज हॉटेल आणि जगमंदिर, काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, फेरीवाले आणि बरंच काही. तर इथे १०-१५ मिनटं घालवून पुढे निघालो ते सिटी पॅलेस आणि जगमंदिर बोट राईड साठी.
सिटी पॅलेस आणि जगमंदिर बोट राईडचे तिकीट एकाच ठिकाणहून घेतले. सिटी पॅलेस ही खरीतर private property आहे. उदयपूरची royal family अजूनही इथे राहते. फक्त काही भाग हा tourists साठी खुला आहे. Gate मधून आत गेल्यावर आधी जगमंदिर साठी डावीकडे वळलो. इथे दुपार २ नंतर ते सूर्यास्तापर्यंत बोट राईड चे भाव जास्त. एव्हाना ११३०-१२०० होत आले होते. मग मध्यम अशा बोटीत बसलो. ३० एक माणसं बसतील एवढी बोट. सोबत life jacket वगैरे. बोट राईड मस्तपैकी पिचोला लेक मधून फिरते. म्हणजे जुनं उदयपूर शहर, सिटी पॅलेस, जुन्या vintage buildings आणि हवेल्या ज्या आता हॉटेल मधे रूपांतरित केल्या आहेत, पुढे ताज हॉटेल, अशी साधारण एक फेरी मारून बोट येते ती जगमंदिर पाशी.
तसं म्हटलं तर हा पॅलेस म्हणजे एक मोठं कॉम्प्लेक्स. गुल महाल इथलं मुख्य आकर्षण. पण नंतर त्याच्या आसपास बाग बगीचे आणि बरंच काही बांधलं गेलं. उदयपूर शहर आणि इकडचे भरपूर पॅलेस हे अशा Destination Wedding साठी प्रसिद्ध आहेत. त्यातलंच हे एक. बऱ्यापैकी फिरून, फोटोग्राफी करून मग परतीच्या बोटीने आलो ते सिटी पॅलेस पाशी.
जगमंदिर मधला गुल महाल |
जिथून बोट पकडली होती, तिथूनच थोडं डावीकडे वळून चालत अगदी २ मिनिटांत सिटी पॅलेसचा रस्ता सुरु. उजवीकडे पॅलेसची मोठी तटबंदी तर डावीकडे लेक पिचोला आणि मधोमध असलेलं ताज हॉटेल. क्या बात!
सिटी पॅलेस समोरून दिसणारं ताज हॉटेल |
असंच थोडं अजून चढावाचा रस्ता चालून आम्ही आलो ते सिटी पॅलेसच्या entrance ला. जुन्या राजस्थानी शैलीतलं कोरवी काम, भव्य तटबंदी, कमानी आणि प्रवेशद्वार असं सगळं काही. पुढे गेल्यावर एकाबाजूला उदयपूरची royal family ची private property. अर्थात तिथे कडेकोट बंदोबस्त आणि आपल्याला प्रवेश नाही. पुढे असेच एक-एक भव्य प्रवेशद्वार बघत आपण येतो ते मुख्य राजवाड्यात. म्हणजे एक मोठं पटांगण आणि चोहोबाजूला राजवाडे, बाग-बगीचे आणि मोठी तटबंदी.
एकदा का मुख्य राजवाड्यात आलो कि मग कुठे कसे फिरायचे, कोणत्या जागा बघायच्या, entry आणि exit कुठे ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्तिथ आहेत. म्हणजे संपूर्ण सिटी पॅलेस ची tour हा एक one-way path म्हणायला हरकत नाही. सुरुवात museum पासून, पुढे एक-एक छोटेमोठे महाल, मग मधेच कुठे राजा-राण्यांच्या खोल्या, मग त्यात मोठया खिडक्या जिथून संपूर्ण परिसर न्याहाळता येईल.
पिचोला लेक मधून दिसणारा सिटी पॅलेस |
एक गोष्ट सगळीकडे प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे well-maintained-heritage. राजस्थानी कला-कौशल्य, कोरीव नक्षीकाम आणि एकूणच राजेशाही थाट आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पणे जपलेल्या👌. जरी गर्दी असली तरी सुरेख चोख व्यवस्था. हो -नाही म्हणता म्हणता आम्ही २-३ तास इथे फिरलो. सगळा पॅलेस enjoy करायचा असेल तर एक संपूर्ण दिवस जाईल एवढा ह्याचा पसारा!
मुख्य प्रवेशद्वार |
भीम विलास |
भव्य तटबंदी |
सिटी पॅलेस! |
पुन्हा मेन गेट पाशी यायला एव्हाना दुपारचे ३ वाजले. सकाळपासून एवढं फिरल्याने तशी भूक लागलीच होती पण त्यात जरा ऊन आणि जेवायला इतका उशीर, म्हटलं थोडंसच जेऊन घेऊ. पुढे आमच्या ड्रायव्हरने Vintage Car Museum जवळच एका चांगल्या हॉटेलपाशी आणून सोडले. साधारण ४ पर्यंत light-lunch करून पुढे आलो ते Vintage Car Museum च्या दारात.
हे Car Museum म्हणजे उदयपूरच्या royal family मध्ये असलेल्या Vintage Car चं संग्रहालय. १९३० पासूनच्या आतापर्यंतच्या अनेक vintage cars इथे. मर्सिडीझ, रोल्सरॉयस, कॅडिलॅक आणि अजून काही ब्रँड्सची विविध मॉडेल्स. साधारण १५-२० गाड्या असतील. उत्तम स्तिथीत आणि व्यवस्थित देखभाल. पुढे जरा विचारपूस केल्यावर कळलं कि ह्या गाड्या अजूनही वापरात आहेत!
पाच एक वाजता इथून काढता पाय घेतला आणि आता वळलो ते शॉपिंग साठी. उदयपूर म्हणजे साड्या, चादरी, चपला आणि बरंच काही. ह्या सगळ्या शॉपिंगची responsibility निकिताकडे 😁. मी आपले काय ते नेहमीसाखे २-३ souvenirs घेतले.
७-७३० वाजता परत हॉटेल वर आलो. आज खूप फिरणं झालं होतं. हॉटेलच्या rooftop restaurant मधेच dinner ला गेलो. मस्त थंडी आणि टेबलाच्या बाजूलाच शेकोटीवजा हीटरची व्यवस्था! बाजूच्या हॉटेल मध्ये एवढ्या जोरानं live music चालू होतं कि आम्हाला फुकटात enjoy करता आलं 😂.
उद्याचा दिवस... चित्तोडगढ!
क्रमशः
2 Comments
Sunder
ReplyDeleteToo good Saurabh, I am a regular reader of your blogs.
Delete