उदयपूर : तोंडओळख आणि सज्जनगढ मॉन्सून पॅलेस
२०२३ मध्ये जानेवारीत पाँडिचेरी आणि जूनमध्ये स्पिती व्हॅली असं ट्रॅव्हल करून झालं होतं. पाँडिचेरी म्हणजे एकदम relaxation tour आणि स्पिती व्हॅली हि जरा adventurous tour झाली होती. मग आता ठरवलं कि असं कुठे फिरायला जाता येईल जिथे थोडा आराम पण करता येईल आणि थोडं फिरणं आणि sightseeing पण. मग ठरलं डिसेंबर मध्ये जाऊया. माझं आणि निकिताचं नोव्हेंबर मध्ये थोडं जास्तचं काम होतं ऑफिस मध्ये आणि Christmas /New-Year ची गर्दी आणि महागडे हॉटेल्स पण टाळायचे होते. मग ठरलं डिसेंबरच्या दुसऱ्या weekend ला फिरून यायचं.
आता कुठे जायचं ते फायनल करायचं होतं. शेवटी उदयपूर, कूर्ग किंवा ऊटी shortlist केली. नोव्हेंबर २०२२ मध्ये केरळ आणि साऊथ इंडियाचा दौरा झालाच होता, so उदयपूरला जायचं हेच फायनल केलं.
उदयपूर म्हणजे City of Lakes. शहरच्या मधोमध ३-४ lakes आणि आजूबाजूला सगळीकडे डोंगर आणि कुशीतच उदयपूर शहर वसलेलं. जरी राजस्थान म्हटलं तरी इथे काही वाळवंट नाही. डिसेंबर म्हणजे थंडीची नुकतीच सुरुवात. फिरायला सुद्धा भरपूर ठिकाणं. सिटी पॅलेस, सज्जनगढ मॉन्सून पॅलेस, पिचोला लेक, फतेह सागर लेक, करणी माता मंदिर, जगमंदिर, गणगौर घाट आणि बरंच काही. त्यात Instagram वर reels आणि फोटो बघून कल्पना होतीच कुठे किती फोटो आणि विडिओ शूट करता येतील ते 😀
सज्जनगढ मॉन्सून पॅलेस वरून दिसणारं उदयपूर शहर |
१५ डिसेंबर, सकाळी लवकर उठून एअरपोर्ट गाठला आणि साधारण ११-१२ पर्यंत उदयपूरला land झालो. हॉटेल बुकिंग आणि साधारण itinerary आधी तयार करून ठेवली होतीच. कुठेही जायचं म्हटलं तर माझ्यातला "traveler" जागा होतो 😁. म्हणजे कसं, आपण कुठे राहणार, जवळ कोणते tourist spots आहेत किंवा hidden gems आहेत, चांगली restaurants कोणती किंवा local food कुठे चांगले मिळेल, local transport कसं करायचं, वगैरे वगैरे.
असो, तर उदयपूर एअरपोर्ट वरून pre-paid taxi बुक करून हॉटेल गाठलं. हॉटेल हे स्वरूप-सागर लेकच्या समोर होते आणि आम्ही lake-view असणारी रूम बुक केली होती. एअरपोर्ट वरून हॉटेल वर येताना ड्राइवरशी सुद्धा itinerary वर चर्चा केली होती आणि त्याने सांगितलेले rates मला ok वाटले. या आधी मी इंटरनेट वरून साधारण कुठे आणि कसं फिरता येईल आणि full-day taxi चे rates कितपत असतील याचा अंदाज घेतलाच होता.
मग ठरलं. हॉटेल वर check-in केलं. एव्हाना १-१:१५ वाजले होते. थोडं फ्रेश होऊन हॉटेलच्याच roof-top restaurant मध्ये lunch उरकून साधारण ३-३:३० ला त्याच taxi driver ला फोन करून आम्हाला pick-up करायला सांगितले आणि निघालो ते सज्जनगढ मॉन्सून पॅलेसकडे.
तसं म्हटलं तर सज्जनगढ मॉन्सून पॅलेस हा शहराच्या थोडा बाहेर. सुरवात होते ती सज्जनगढ वाइल्ड लाईफ सँक्चुरी पासून. एंट्रन्सच्या एका बाजूला वाइल्ड लाईफ सँक्चुरी तर दुसऱ्या बाजूला पॅलेसला जायचा घाटवजा नागमोडी रस्ता. पॅलेस हा प्रसिद्ध आहे तो सूर्यास्त बघण्यासाठी. त्या व्यतिरिक जास्त काही नाही. बाकी पॅलेस जरा छोटाच आहे. एव्हाना ४ वाजले होते. म्हटलं ४३०-५ पर्यंत वाइल्ड लाईफ सँक्चुरी फिरून घेऊ, मग पॅलेसला जाऊ कारण सूर्यास्त ६-६१५ ला होणार होता.
वाइल्ड लाईफ सँक्चुरी म्हणजे थोडं प्राणिसंग्रहालय. म्हटलं तर इथे जास्त काही maintainकेलेले नव्हतं आणि काही ठिकाणी तर अजून बांधकाम चालू होतं. तरी हो नाही म्हणत ३०-४० मिनिटं फिरलो. काळवीट, मगरी-सुसरी, साळींदर, काही पक्षी असे १०-१२ प्राणी-पक्षी बघून पुन्हा main gate पाशी आलो आणि मोर्चा वळवला तो मॉन्सून पॅलेस कडे.
थोडा चढाव आणि नागमोडी रस्ता संपला कि सुरुवात होते ती प्रशस्त अशा बाग बगीच्यांनी. पुढे गेल्यावर मोठी तटबंदी आणि मुख्य प्रवेशद्वार. उंच, भव्य आणि कोरीवकाम केलेलं. Tourist Point असल्याने थोडी फार गर्दी होतीच. त्यात डिसेंबर महिना त्यामुळे शाळेची एक सहल सुद्धा आलेली 😅 .
सज्जनगढ मॉन्सून पॅलेस |
मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक उंच असा महाल. आणि त्याच्या पुढे जाऊन जरा मोकळा भाग जिथे मस्त पैकी बसून सूर्यास्त बघता येईल अशी जागा. तरी एवढ्या गर्दीत आम्ही बऱ्यापैकी चांगली जागा पकडून तिथेच ३०-४० मिनिटं ठाव मांडून बसलो. समोर दिसणारा सूर्य हळूहळू अस्ताला येत होता. सोनेरी-केशरी अशी रंगाची उधळण होऊन एक मस्त color-combination दिसत होतं. मी आधीच कॅमेरा वगैरे ready ठेऊन होतो. मग म्हटलं एका जागेवरून किती फोटो काढणार? थोडं इथे तिथे फिरत, गर्दीतून वाट काढत वेगवेगळ्या ठिकाणहून फोटो काढायचे प्रयन्त केले.
सज्जनगढ वरून दिसणारा सूर्यास्त |
सज्जनगढ मॉन्सून पॅलेस |
मग ६३०-६४५ पर्यंत परत उदयपूरकडे निघालो. अजून dinner ला तसा वेळ होता, मग ड्राइवर म्हणाला चला, फतेह सागर लेक बघून घेऊ. फतेह सागर लेक म्हणजे शहराच्या एका बाजूला असलेला मोठा तलाव. त्याच्या चोहोबाजूला चालण्या-फिरण्यासाठी व्यवस्थित जागा. काही भाग तर गर्दीने एवढा भरलेला आणि एवढा गजबजाट आणि खाऊ गल्लीचे असंख्य स्टॉल, असं वाटलं जुहू किंवा गिरगांव चौपाटीला तर आलो नाही ना 😂. पुढे गेल्यावर जरा शांत भाग. गाडी आधीच पार्क करुन पुढे चालत जायचं होतं. म्हणजे थोडं मरिनड्राइव्ह सारखं होतं. काही लोकं jogging आणि running करण्यात मग्न. काही सिनियर सिटिझन्स बाकांवर बसून गप्पांमधे रंगलेले. काही Gen-Z हातात मोबईल किंवा कॅमेरा घेऊन Instagram Reels बनवण्यात busy. आम्ही दोघं असंच चालत, गप्पा मारत मधेच फोटो काढतं साधारण १५-२० घालवली आणि निघालो ते early dinner साठी.
फतेह सागर लेक वरची संध्याकाळ |
Dinner साठी आधीच एक रेस्टॉरंट बघून ठेवलं होतं, "1559 AD". थोडं fine-dine type होतं. आणि राजस्थानी खाण्यासाठी प्रसिद्ध. आम्ही मुद्दामच ७१५-७३० ला पोचलो म्हणजे गर्दी नको. नाही म्हटलं तरी आधीच ५-६ tables भरली होती. मुंबईपेक्षा जास्त थंडी असल्यानं indoor seating मधे बसलो. निकिताने order केलं दाल बाटी चुरमा आणि मी, रोटी आणि राजस्थानी लाल मांस. दोन्ही local food. दोन्ही पदार्थ उत्तम. सर्विस पण छान. Ambiance तर मस्तच. A must visit.
८३०-९ पर्यंत सगळं आटपून finally आमच्या हॉटेलला परत आलो. उद्याचा दिवस म्हणजे सिटी पॅलेस आणि बरंच काही!
क्रमशः
1 Comments
खूप सुंदर लिहिले आहेस, सौरभ.
ReplyDelete