उदयपूर : चित्तोरगढ आणि परतीचा प्रवास
उदयपूर मधला तिसरा दिवस. १७ डिसेम्बर. आज चित्तोडगढचा प्लॅन होता. मी आधीच online booking करून tour बुक केली होती. Pick-up आणि drop सहित. साधारण ९-९३० पर्यंत आटपून ब्रेकफास्ट करून आम्ही ready झालो. टॅक्सी ड्राइवर सुद्धा हॉटेलपाशी एवढ्यात आला होताच.
उदयपूर ते चित्तोडगढ म्हणजे २३०-३ तासाचा प्रवास. संपूर्ण किल्ला पाहायला अजून ३ एक तास, आणि मग परतीचा २३०-३ तासाचा प्रवास. एकूणच काय तर पूर्ण दिवस आज चित्तोडगढ साठी. ९३० च्या आसपास आम्ही निघालो. मध्ये highway वर १ छोटा ब्रेक घेत साडे अकरा पर्यंत चित्तोडगढ ह्या शहरात आलो.
चित्तोडगढ किल्ला हा तसा बऱ्यापैकी मोठा आहे. म्हणजे अजूनसुद्धा किल्ल्यावर गावं आहेत आणि लोकं तिथे राहतात. माझा आधी असा समज होता कि हा किल्ला म्हणजे जयपूर किंवा जोधपूर च्या royal forts सारखा असेल. पण इथे चित्र एकदम वेगळं. किल्ल्याचा विस्तार खूप मोठा. संपूर्ण किल्ला फिरायचा म्हणजे टॅक्सी किंवा एखादी गाडी हवीच. किल्ल्याच्या पायथ्यापासून वरपर्यंत जाताना ७ वेगवेगळे दरवाजे लागतात. इथे त्याला "पोल " म्हणतात. म्हणजे जसे भले मोठे दरवाजे, आजूबाजूला भक्कम तटबंदी आणि लढाईला सज्ज अशी व्यवस्था. भैरव पोल, हनुमान पोल, गणेश पोल, राम पोल असे करत करत आम्ही किल्ल्यात प्रवेश केला.
सुरुवात केली ती राणा कुंभ महालापासून. तसा बऱ्यापैकी मोठा महाल, पण पडीक. सततची आक्रमणे आणि काळाच्या ओघात आता फक्त पडक्या भिंती आणि चौथरे उरले आहेत. तरी साधारण अशी कल्पना येते कि त्या काळी महालाची रचना कशी असेल ते. विविध खोल्या, balcony, बाग-बगीचे इत्यादी. इथेच १५-२० मिनिटं फिरून पुढे गेलो ते जैन श्वेतांबर मंदिर बघायला.
राणा कुंभ महाल |
जैन मंदिरांचा इतिहास काही जास्त कळला नाही, पण इथे परिस्थिती एकदम opposite. सुबक नक्षीकाम, मंदिराचा well-maintained परिसर, शांतता आणि प्रसन्न वातावरण. पुढे जवळच अजून २ मंदिरे. कुंभश्याम मंदिर आणि मीरा मंदिर. दर्शन घेऊन पुढे निघालो ते प्रसिद्ध विजयस्तंभाकडे!
कोरीव नक्षीकाम |
विजयस्तंभ ! मेवाडचा राजा राणा कुंभ ह्याचा महमूद खिल्जी वरचा विजय आणि हा विजयस्तंभ म्हणजे त्यात लढाईतील विजयाची निशाणी ! राजस्थानातील इतर ऐतिहासिक ठिकाणांप्रमाणेच विजयस्तंभ सुद्धा कला कौशल्य आणि कोरीव कामाचा एक उत्तम नमुना!
विजयस्तंभ |
विजयस्तंभाच्या पुढेच २ पावलांवर एक छान मंदिर होतं. समाधीश्वर महादेव मंदिर. त्याच्या पूढे १०-१५ मिनिटांवर कंकाली माता मंदिर आणि कालिका माता मंदिर.
असंच हळूहळू पुढे जात राणी पद्मिनी महाल, कीर्ती स्तंभ आणि चित्तोडगढ किल्ल्याचं दुसऱ्या बाजूचं द्वार - सुरज पोल बघून आम्ही दुपारच्या जेवणाला थांबा घेतला. आज जेवण जरा उशिराच. तर एव्हाना आमची संपूर्ण किल्ल्याला एक वर्तुळाकार फेरी झाली होती. साधारण ४ पर्यंत जेवण आटपून परत उदयपूरच्या वाटेनं परतीचा प्रवास सुरु केला.
साधारण ६३०-७ पर्यंत हॉटेल ला पोचलो. हॉटेल पासून १५-२० मिनिटं चालतच "खम्मा घणी" नावाचं प्रसिद्ध असं मोठं रेस्टॉरंट. आजचा उदयपूरमधला शेवटचा dinner इथेच.
-----
आज सोमवार, १८ डिसेंबर. ८-८३० पर्यंत उरकून घेतलं. हॉटेलचा included breakfast थोडा कमीच घेतला. ९ पर्यंत हॉटेल सोडलं. पुढचा स्टॉप म्हणजे उदयपूर आणि राजस्थानची प्रसिद्ध कचोरी आणि घेवर खाण्यासाठी आणि मुंबईला थोडी घेऊन जायला 😁.
परतीचा प्रवास सुद्धा taxi ने बुक केला होता आणि ड्राइव्हरलाच सांगितलं होतं की जरा चांगल्या ठिकाणी स्टॉप घेऊ कचोरी आणि घेवर साठी. हॉटेल पासून साधारण १५-२० मिनिटांत एका बऱ्यापैकी गर्दीच्या ठिकाणी आलो. JMB. जगदीश मिष्ठान्न भंडार. बऱ्यापैकी गर्दी. कचोरी, समोसा, ढोकळा, पोहे, चहा, दुध आणि बऱ्याच गोष्टी. अहाहा. काय त्या गरम गरम कचोऱ्या, बरोबरची तिखट-गोड चटणी! मसाल्याचा सुंगंध. काय खाऊ आणि काय नको असं झालं 😅.
राजस्थानी कचोरी |
मग काय गरमा गरम राजस्थानी कचोरी, त्यावर तिखट गोड चटणी. भाई, मजा आ गया ! सोबत अजून ५-६ कचोऱ्या parcel घेतल्या मुंबईला आणायला. गोड बर्फी आणि पेढे पण खूप variety. पण माझं ठरलेलं. राजस्थान म्हणजे घेवर. ते पण मलई वालं ! ते पण २ boxes पॅक करून घेतले.
एव्हाना ९-९३० झाले. परत taxi मध्ये बसून २०-२५ मिनिटांत आलो एअरपोर्टला. मग काय... चला परत त्याच चक्रात. ऑफिस एके ऑफिस आणि पुढच्या trip चं planning 😄
समाप्त.
1 Comments
झकास
ReplyDelete